Jump to content

हॉथॉर्न (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॉथॉर्न अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील छोटे शहर आहे. लॉस एंजेलस महानगराचा भाग असलेले हे शहर लॉस एंजेलस काउंटीमध्ये आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८४,२९३ होती.[१]

हॉथॉर्न लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ८ किमी अंतरावर आहे.

येथे स्पेसएक्सचे मुख्यालय आणि मिशन कंट्रोल सेंटर आहे तसेच द बोरिंग कंपनी, टेसला, ओएसआय सिस्टम्स, नॉर्थ्रोप कॉर्पोरेशन सह अनेक मोठ्या कंपन्यांची कार्यालये आहेत.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Population and Housing Unit Estimates". May 21, 2020 रोजी पाहिले.