हॉजसनची वृक्ष तिरचिमणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॉजसनची वृक्ष तिरचिमणी

हॉजसनची वृक्ष तिरचिमणी (इंग्लिश:Indian Tree Pipit; हिंदी:चचडी, मुसारिची) हा एक पक्षी आहे.

मध्यम आकाराच्या चिमणीएवढी. वरील भागाचा रंग हिरावत तपकिरी व त्यावर गर्द तपकिरी रेषा. भुवया, पंखावरील पट्टे आणि शेपटीच्या मध्यभागाचा रंग पंढूरका. छाती व दोन्ही अंगांचा रंगही पंढूरका आणि त्यावर ठळक गर्द तपकिरी रेषा असतात. नर-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण[संपादन]

हिमालयात धर्मशाला, कांग्रा व कुलू, पूर्वेकडे भूतान आणि अरुणाचल प्रदेश या भागांत उन्हाळी पाहुणे. बांगला देश व भारतीय द्वीपकल्प या भागांत हिवाळी पाहुणे.

निवासस्थाने[संपादन]

गवती कुरणे, नेच्यानी युक्त असा उताराचा प्रदेश, दगडाळ जमीन, ओक, फर आणि देवदारांच्या जंगलांतील उघडा भाग

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली