Jump to content

हॉकर हरिकेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दुसऱ्या महायुद्धात भाग घेतलेले एक हॉकर हरिकेन विमान

हॉकर हरिकेन हे ब्रिटिश बनावटीचे लढाऊ विमान आहे. एक इंजिन आणि एक वैमानिक असलेले हे विमान १९३५-४४ दरम्यान तयार केले गेले. दुसऱ्या महायुद्धात व नंतर रॉयल एर फोर्स, रॉयल नेव्ही आणि सोवियेत वायुसेनेने या विमानाचा वापर केला. या प्रकारची एकूण १४,583 विमाने तयार केली गेली.[१] यांपैकी १७ विमाने अजूनही उड्डाण करण्याच्या स्थितीत आहेत.

बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये हरिकेन आणि सुपरमरीन स्पिटफायर विमानांनी लुफ्तवाफेच्या सरस असलेल्या मेसरश्मिट १०९ प्रकारांच्या विमानांशी झुंज घेउन लुफ्तवाफेला हवाई नियंत्रण मिळू दिले नाही.

  1. ^ "Hawker Hurricane – Great Britain". The Aviation History On-Line Museum. Retrieved: 17 January 2011.