सुपरमरीन स्पिटफायर
Appearance
सुपरमरीन स्पिटफायर हे ब्रिटिश बनावटीचे लढाऊ विमान आहे. एक इंजिन आणि एक वैमानिक असलेले हे विमान १९३६-४८ दरम्यान तयार केले गेले. दुसऱ्या महायुद्धात व नंतर रॉयल एर फोर्स तसेच काही दोस्त राष्ट्रांच्या वायुसेनेने या विमानाचा वापर केला. आजही अंदाजे ७० विमाने उड्डाण करीत असतात.
बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये स्पिटफायर आणि हॉकर हरिकेन विमानांनी लुफ्तवाफेच्या सरस असलेल्या मेसरश्मिट १०९ प्रकारांच्या विमानांशी झुंज घेउन लुफ्तवाफेला हवाई नियंत्रण मिळू दिले नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर रॉयल एर फोर्सने दहा स्पिटफायर विमाने भारतीय वायुसेनेला विकली होती. यांचा उपयोग १९४८ च्या युद्धात झाला.