हेन्री डिरोझियो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हेन्री लुई व्हिवियन डिरोझियो (१८ एप्रिल, १८०९:कोलकाता, भारत - २६ डिसेंबर, १८३१:कोलकाता, भारत) हे एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाजसुधारक होते. हे कोलकात्याच्या हिंदू कॉलेजचे सहायक हेडमास्तर होते. बंगाली तरुणांमध्ये आधुनिक विचार रुजविण्याचे श्रेय यांना जाते. यांचे अनुयायी तरुण बंगाली म्हणून ओळखले जातात.

डिरोझियो यांचे वडील पोर्तुगीझ-भारतीय होते तर आई इंग्लिश होती. त्यांचे मूळ आडनाव दो रोझारियो होते. हेन्री डिरोझियो स्वतःला भारतीय समजत. [१]

डिरोझिया यांचा वयाच्या २२व्या वर्षी कॉलेराने मृत्यू झाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Reddy, Sheshalatha (2014). "Henry Derozio and the Romance of Rebellion (1809-1831)". DQR Studies in Literature. 53: 27–42. ISSN 0921-2507.