हुमायून अब्दुलअली
Appearance
(हुमायून् अब्दुलअली या पानावरून पुनर्निर्देशित)
हुमायून अब्दुलअली | |
हुमायून अब्दुलअली यांचे चित्र | |
जन्म | मे १९, १९१४ कोबे, जपान |
मृत्यू | जून ३, २००१ मुंबई, भारत |
नागरिकत्व | भारत |
धर्म | इस्लाम (सुलेमानी बोहरा) |
कार्यक्षेत्र | निसर्गवादी, पक्षिविद्यातज्ज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ता, वर्गीकरणशास्त्रज्ञ |
कार्यसंस्था | बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी |
प्रशिक्षण | सेंट झेवियर्स कॉलेज |
पुरस्कार | महाराष्ट्र फाऊंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार (१९९८) |
वडील | नजमुद्दीन फैझलहुसेन अब्दुलअली |
आई | लुलू |
पत्नी | रफिया तय्यअजी |
अपत्ये | अकबर अब्दुलअली, सलमान अब्दुलअली |
हुमायून अब्दुलअली (मे १९, १९१४, कोबे, जपान - जून ३, २००१, मुंबई, भारत)[१] भारतीय निसर्गवादी, पक्षिविद्यातज्ज्ञ, वन्यजीव संवर्धनकर्ते आणि वर्गीकरणशास्त्रज्ञ होते. भारताचे "पक्षिपुरुष" म्हणून ओळखले जाणारे पक्षिविद्यातज्ज्ञ सलीम अली यांचे ते चुलत भाऊ होते. त्या काळच्या इतर निसर्गतज्ज्ञांप्रमाणे त्यांनाही सुरुवातीला शिकारीत रस होता. त्यांचे मुख्य योगदान पक्षी संग्रहांवर आधारित होते, विशेषतः बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये जिथे त्यांच्या आयुष्यातील बहुतांश काम केले.
प्रारंभिक वर्षे आणि शिक्षण
[संपादन]हुमायूं अब्दुलली यांचा जन्म १९१४ साली कोबेमध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव लुलु होते आणि वडिलांचे नाव नजमुद्दीन फैझलहुसेन अब्दुलअली होते. त्यांचे वडील भारतातून कच्चा कापूस आणि काडेपेट्या आयात करणारे व्यापारी होते.