हुकूमदेव नारायण यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हुकूमदेव नारायण यादव (नोव्हेंबर १७, इ.स. १९३९) हे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर जनता दलाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९९ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहार राज्यातील मधुबनी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते इ.स. १९८० ते इ.स. १९८६ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.