हिरवे कासव
Appearance
हिरवे कासव (शास्त्रीय नाव:Chelonia mydas; इंग्लिश:Green Turtle) हा समशीतोष्ण कटिबंध, उष्ण कटिबंध व उपोष्ण कटिबंधात आढळणारा उभयचर प्राणी आहे. हे प्राणी जगभरातील उष्णकटिबंधातील किनारे व बेटे येथे घरटी करतात.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- वर्णन- ह्या कासवांचे वजन साधारणतः 250 कि.ग्रॅ. एवढे असते. पृष्ठत्वर्म (Carapace)चा रंग पाठीमागे संगमरवरी हिरवट असतो व त्यावर गडद रंगाचे ठिपके अगर रेषा असतात.पूर्ण वाढ न झालेल्या कासवाच्या पाठीवर मातकट रंगाच्या रेघोट्या असतात. त्याची लांबी 90 ते 120सें.मी.एवढी असते व आकार अंडाकृती रूंद असतो.अधरत्वर्म (Plastron)चा रंग पिवळसर असतो.डोक्यावर ललाटपूर्व परिरक्षींची एकच जोडी असते.नासिकांपासून सरळ खाली उतरणारे लहान व बसके नाकाड. ह्या कासवाचे पाय वल्ह्यासारखे असतात व पुढील प्रत्येक पायावर एक नख असते.
- खाद्य- नवजात पिल्ले वयाच्या एक वर्षापर्यंत मांसभक्षी असतात व पुढील संपूर्ण आयुष्य शाकभक्षी असतात. सागरी शैवाल व सागरी गवत इ.खातात.
- वीणीचा हंगाम- वर्षभर,प्रामुख्याने मे ते सप्टेंबर.मादी वीणीच्या एका हंगामात 4ते 6वेळा 10ते 14 दिवसांच्या फरकाने रात्रीच्या वेळी अंडी घालते.अंड्यांची संख्या 100ते120 एवढी असते.अंडी उबवणीचा काळ साधारणतः 45ते70 दिवस एवढा असतो.
- सद्यस्थिती- अंड्यांचा अन्न म्हणून उपयोग करणे, अंडी घालण्याच्या जागांचा विनाश व प्रौढ कासवांची मोठ्या प्रमाणात होणारी हत्या यामुळे ही जात संकटात आहे.भारतीय वन्य जीव (संरक्षण) कायदा 1972 मधील अनुसूची-1 अन्वये संरक्षित