Jump to content

हिना रब्बानी खर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हिना रब्बानी खर

हिना रब्बानी खर (उर्दू: حنا ربانی کھر ; रोमन लिपी: Hina Rabbani Khar ) (१९ नोव्हेंबर, इ.स. १९७७; मुलतान, पंजाब, पाकिस्तान - हयात) ही पाकिस्तानातील राजकारणी आहे. २० जुलै, इ.स. २०११ रोजी हिने पाकिस्तानाच्या परराष्ट्रमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. या पदावर आरूढ झालेली हिना ही पहिली स्त्री, तसेच सर्वांत तरुण व्यक्ती आहे. तत्पूर्वी ही इ.स. २००२ व इ.स. २००८ सालांतल्या निवडणुकींत एनए-१७७ मुझफ्फरगढ-२ या मतदारसंघातून राष्ट्रीय विधिमंडळात निवडून गेली होती. हिचे वडील गुलाम नूर रब्बानी खर हे पाकिस्तानी राजकारणी, जमीनदार असून चुलते गुलाम मुस्तफा खर पंजाब प्रांताचे माजी गव्हर्नर होते.

बाह्य दुवे

[संपादन]