Jump to content

हिंदू संपत्तीची लूट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिंदू संपत्तीची लुट या पानावरून पुनर्निर्देशित)

हिंदू समाजाने आपल्या जोरावर उभी केलेली संपत्ती लुटण्याच्या घटनांना हिंदू संपत्तीची लुट म्हंटले गेले आहे. प्रामुख्याने इस्लामिक आक्रमणकर्त्यांपासून हा प्रकार सुरू झाला. पहिल्या शतकापासून ते इ.स एक हजार पर्यंत भारत ही जगातील आघाडीची अर्थव्यवस्था होती.[१] सिंध वर पहिले आक्रमण इस्लामी आक्रमकांनी केल्या नंतर इस्लामिक आक्रमकांनी भारतातील विद्यापीठे उद्ध्वस्त केली. येथील आर्थिक व्यवस्था विस्कळीत करून टाकली. भारतातील हिंदू प्रजेच्या घामातून आणि कष्टातून काढलेली संपत्ती आणि संसाधने इस्लामी आक्रमकांनी दमास्कस, बगदाद, कैरो किंवा ताश्कंद येथील इस्लामिक खिलाफतच्या खजिन्यात, मक्का या इस्लामिक पवित्र शहरांमध्ये पोचवली. विजयनगरचे अवशेष नंतरच्या टप्प्याची साक्ष देतात.[२] हिंदू संपत्तीची लुट हा हिंदूंच्या छळाचा एक प्रकार आहे. त्या आधी हिंदू भारतातून जेथे बाहेर जात ते प्रदेशही संपन्न होत जात असत. उदाहरणार्थ, हिंदू लोक जावा बेटावर गेल्यावर तेथे मोठी संपन्नता आली. तसेच हिंदू लोक आपली संस्कृउती घेउन कंबोज म्हणजे आजच्या व्हिएत्नाम गेले तेथे ही ऐतिहासिक काळात मोठी संपन्नता आल्याचे दिसते.

आक्रमकांनी केलेली लूट[संपादन]

इतिहासकार अबुल फझल यांनी आईने अकबरी या ऐतिहासिक बखरीत हिंदूंच्या संपत्तीबद्दल असे लिहून ठेवले आहे: “इराण आणि तुरानमध्ये, जिथे फक्त एक कोषाध्यक्ष नियुक्त केला जातो, खाते गोंधळलेल्या अवस्थेत आहेत; पण इथे भारतात, कमाईचे प्रमाण इतके मोठे आहे, आणि व्यवसाय इतका बहुविध आहे की पैसा साठवण्यासाठी 12 कोषागारे आवश्यक आहेत, नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या रोख रकमेसाठी आणि तीन मौल्यवान दगड, सोने आणि जडलेल्या दागिन्यांसाठी. . खजिन्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की मी माझ्यासमोर इतर प्रकरणांसह योग्य वर्णन दिले आहे.[३] मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर, बाबरनामा या आत्मचरित्रात त्याने हिंदूंची लूट कशी केली आणि मग तीच लूटलेली संपत्ती समरकंद, खुरासान, मक्का आणि मदिना येथील पवित्र पुरुषांना "देवाच्या कारणासाठी" पाठवलेल्या भेटवस्तू आणि भेटवस्तूंची नोंद आहे. याची फार मोथी चर्चा जगात झाली असे दिसून येते. कारण तेथून दूर असलेल्या तत्कलिन पर्शिया म्हणजे आजच्या इरान येथील इतिहासकार फिरिश्ता यांच्या म्हणण्यानुसार, "बाबरने स्वतःला त्याच्या हिंदूंच्या प्रचंड लूटीने इतके प्रसिद्ध केले की त्याला कलंदर असे टोपणनाव देण्यात आले." मात्र हिंदूंना यातून काहीही परत मिळाले नाही. उलट अनेक हिंदू गुलाम म्हणून येथे विकले गेले. तुघलकाच्या काळात किमान एक लाख गुलाम हिंदू विकल्याची नोंद आहे. हे लोक गुलाम बनवतांना त्यांची संपत्ती ही लुटली गेली होती. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात हिंदूंचा छळ केला गेला.[४] इ.स. १७३९ मध्ये कर्नालच्या लढाईत मुघलांचा नादेर शाह याने दिल्लीची लूट केली. या प्रसंगी सुमारे पाच मजली उंच हिंदूंच्या मुंडक्यांचा ढीग दिल्लीच्या सीमेवर जमला होता. आणि किमान एक हजार उंट आणि वीस हजार घोडे लादलेली दिल्लीतून हिंदूंची लुटलेली सोने चांदी आणि इतर मौल्यवान रत्ने अशी संपत्ती घेउन गेले.[५]

  1. ^ Simha, Rakesh Krishnan (2019-07-30). "Islamic loot: How the Mughals drained wealth out of India". IndiaFacts (इंग्रजी भाषेत). 2022-09-19 रोजी पाहिले.
  2. ^ "Did arrival of Muslim invaders a thousand years ago destroy Hindu culture?". www.dailyo.in (इंग्रजी भाषेत). 2022-09-19 रोजी पाहिले.
  3. ^ "Ain i Akbari". persian.packhum.org. 2022-09-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Of Mughal Riches And British Loot of India - PGurus" (इंग्रजी भाषेत). 2019-07-16. 2022-09-19 रोजी पाहिले.
  5. ^ Babaie, Sussan (2018-07-12). "Nader Shah, the Delhi Loot, and the 18th-Century Exotics of Empire" (इंग्रजी भाषेत). doi:10.1093/oso/9780190250324.003.0012. Cite journal requires |journal= (सहाय्य)