हाटकर
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हाटकर किंवा हटकर ही प्राचीन क्षत्रिय योद्धा जमात आहे. जी भारताच्या दख्खन प्रदेशात आढळते.
त्यांची मूळ भाषा मराठी आहे.
हटकर, विशेषतः मराठवाडा प्रदेशातील, हटकर क्षत्रिय आहेत आणि त्यांचा वंश योद्धा परंपरेशी संबंधित आहे.
- हाटकर मुख्यतः महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश मध्ये वास्तव्यास आहेत.[१]
हाटकर शब्दाचा अर्थ:
"हाट" म्हणजे "लढाई" किंवा "युद्ध" & "कर" म्हणजे "करणारा.
- हाटकर = लढणारा किंवा योद्धा समाज.
- विदर्भात आणि मराठवाड्यात हटकरांची संख्या खुप आहे. मराठवाड्यातील व विदर्भ भागात सधन व उच्चशिक्षित "हटकर पाटील" आहेत.
ईतिहास
[संपादन]- Captain Fitzgerald यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातून १३ व्या आणि १४ व्या शतकात महाराष्ट्रात बारा कुळींचे लोक एकत्र आले आणि त्यांनी एक बारा-हट्टी गाव तयार केले. त्याला बाराहट्टीचा देश म्हणू लागले. सध्या या भागाला हिंगोली आणि आजूबाजूचा परिसर म्हणून ओळखले जाते आणि यावरूनच पुढे हटकर असे नाव पडले.
- "१४ व्या शतकात जेव्हा निजाम दख्खनचा सुभेदार म्हणून आला होता, त्याच काळात हटकरसुद्धा आले होते", असे ते म्हणतात.
सर्व हटकर जेव्हा कधी मोहिमेवर जातात तेव्हा हातात एक भाला आणि तलवार घेऊनच निघतात. त्यामुळे त्यांना "बर्गी किंवा बारगीर" सुद्धा म्हणले जाते.
- अकबराने 'ऐन-ए-अकबरी' नामक ग्रंथात हटकरांचा उल्लेख केला आहे, तो असा - "हटकर हे स्वाभिमानी आहेत, ही राजपुतांची पराक्रमी आणि घमंडी प्रकारची जात आहे. त्यांनी बाशीम (सध्याचे वाशीम) येथे सशस्त्र सेना तयार केली आहे त्यांच्याकडे १००० घोडदळ आणि ५००० पायदळ सैन्य आहे. त्यांनी आजूबाजूचे राज्य आणि किल्ले कब्जात ठेवले आहेत. त्यांना धनगर पण म्हणतात, पण ते राजपूत आहेत."
हटकर जमात मुळातच लढवय्ये होती.
- ब्रिटिश काळात इसवी सन १८००-१८२० या काळात जमातीने नांदेड, परभणी व पैनगंगेच्या प्रदेशात धुमाकूळ घातला. हंसाजी नाईक हटकर हा त्यांचा नेता होता. त्यांनी नांदेड व वऱ्हाड मधील अनेक प्रमुख ठाणी आपल्या ताब्यात घेतली. त्यांचे ‘नोवा‘(जिल्हा नांदेड) हे प्रमुख ठाणे होते. या ठाण्याला इंग्रजांनी ८ जानेवारी १८१९ रोजी वेढा घातला. तेव्हा किल्ल्यात एक महिना संघर्ष चालू होता. हंसाजी नाईक यांनी एक महिना ब्रिटिशांविरुद्ध झुंज दिली.
निजामाच्या राज्यात हटकरांचा दरारा होता. आणि ब्रिटिशांच्या काळात त्यांना सतत युद्धाला उभे राहणारे आणि बंड करण्यात कुख्यात आहेत, असेच समजले जाते. हटकरांमध्ये युद्धात छातीवर वार घेणे आणि शहीद होणे ही अभिमानाची गोष्ट समजली जाते. हटकरांमध्ये मिश्या कधी कापत नाहीत. मिश्या ठेवणाऱ्यांना मान दिला जातो. हटकर पुरुष हे शारीरिक दृष्ट्या धष्टपुष्ट, स्वतंत्र राहणारे, आणि स्वाभिमानी असतात. हटकरांना महाराष्ट्र सरकारने त्यांना भटकी जमात वर्ग-२ म्हणजे (NT-C) प्रवर्गात समाविष्ट केले आहे. महाराष्ट्रात आल्यावर यांचा मुख्य व्यवसाय शेती होता. पण मूळचेच शूर असल्यामुळे यातील काही सैन्यात भरती झाले आणि काहींनी गावातील प्रशासनात सहभाग घेतला.हटकर समाजात विट्टलराव नाईक, माधवराव नाईक यांनी निजाम विरोधात स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केले होते.
हटकरांचा ध्वज:
हटकरांचा स्वतःचा वेगळा ध्वज असतो, निजामाच्या काळात हटकरांची संख्या अधिक होती. त्यांच्या लष्करी पेशाला शोभेल असा झेंडा त्यांच्याकडे असे, झेंड्याचा वरील भाग हा पिवळा असून खालच्या बाजूला तो लालसर रंगाचा असे. समाजातील कुठल्याही सामाजिक कार्यात, किंवा युद्धाच्या वेळी हटकर स्वतःचा झेंडा घेऊनच निघतात. इतिहासात अशाच प्रकारचे झेंडे दोन साम्राज्यांचे आहेत.
- दक्षिणेतील विजयनगरच्या साम्राज्यातील वडियार घराण्याचे म्हैसूरचे राज्य. त्यांचा झेंडा तंतोतंत असाच आहे. आणि
- म्हणजे राजस्थान आणि पंजाब मधील भाटी राजपुतांच्या राज्याचे झेंडे.
हे झेंडे रंगाने मिळते जुळते आहेत.
- महाराष्ट्रात धनगर समाजाचे दोन मुख्य प्रवाह आहेत असे सांगितले जाते त्यापैकी एक म्हणजेच हटकर होय. आज हटकर समाज शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या पुढारलेला असून विविध राजकीय व प्रशासकीय व्यक्ती समाजाने दिलेले आहेत. हटकर समाजा मध्ये उच्च साक्षरता दर असून आर्थिक दृष्ट्या हा गट सधन आहे.
प्रमुख वर्चस्व असलेले प्रदेश:
[संपादन]१. मराठवाडा (महाराष्ट्र):
जिल्हे: लातूर, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड
किल्ले: औसा, उदगीर, नळदुर्ग, परळी, कंधार ह्या किल्ल्यांवर हटकर सरदार होते
काही हाटकर पाळयेकरांनी छोटे भाग स्वतंत्रपणे प्रशासित केले होते.
२. हैदराबाद कर्नाटका / कल्याण-कर्नाटका:
जिल्हे: बीदर, गुलबर्गा (कलबुर्गी), यादगिरी, रायचूर
बहमनी सुलतानत, निजाम आणि कल्याणी चालुक्यांच्या काळात महत्त्वाची भूमिका.
३. तेलंगणा व आंध्रप्रदेश:
जिल्हे: निजामाबाद, आदिलाबाद
येथेही हाटकर समाज आढळतो; काही ठिकाणी ते अजूनही मराठी, कन्नड आणि तेलुगू मिश्रित बोली बोलतात.
छ. शिवाजी महाराजांच्या काळातील हटकर सरदारांची नावे
[संपादन]- निम्बाजी पाटोळे
- हिरोजी शेळके
- दादाजी काकडे
- बळवंतराव देवकाते
- व्यंकोजी खांडेकर
- अंगदोजी पांढरे
- धनाजी शिंगाडा
- भवाणराव देवकाते
- बनाजी बिर्जे
- येसाजी थोरात
- संभाजी पांढरे
- गोदाजी पांढरे
- इन्द्राजी गोरड
- नाईकजी पांढरे
- ग्यानुजी होडगिर
- तुका पोले
- भगाजी करे
- तानाजी राजे कोकरे
- लाखोजी कोकरे
प्रसिद्ध घराणी
[संपादन]छत्रपती शिवाजी महाराजानंतर मराठे आणि औरंगजेब यांच्यात ज्या लढाया झाल्या त्यामधून प्रसिद्ध झालेली हटकर सरदारांची घराणी[२][३][४][५][६]
- देवकाते
- बंडगर
- शेंडगे
- कोळेकर
- होडगिर
- गोफणे
- वाघमोडे
- काळे
- धायगुडे
- शिंदे
- मासाळ
- हजारे
- मदने
- खरात
- शेळके
- सलगर
- पुणेकर
- पाटोळे
- खताळ
- माने
- फणसे
- टकले
- बारगळ
- शिंगाडे
- डांगे
- काकडे
- गाढवे
- महानवर
- बरगे
- हाके
- रूपनवर
- गलांडे
- भानुसे
- सोलणकर किंवा सोनवलकर
- बने
- आगलावे
- वाघे
- वाघमारे
- पांढरे
- सदगर
- लवटे
- करे
- कोकरे
- वलकर किंवा वलेकर.
- पौळ (पवार)
- मस्के
- शेम्बडे
- देवकते
- येळे
- बुर्ले
- ढाले
आडनावे
[संपादन]विदर्भ आणि मराठवाड्यातील:-
थिटे(पाटील) नरवटे/नरुटे(पाटील), भांबेरे(पाटील), येळे(पाटील), भांडे, नप्ते, चोरमले, कन्नर, कुन्नर, नेवडे, जरारे, जेढर, शेळके, शिंदे, काळे, सोनुने, हाके, इतवारे, रामेकर, वाघमोडे, सोर, बादाड, बारे, संसारे, आवाड, नेमाने, माटे, डोने, ढाले, पाराधे, पारखे, बंडगर, घोडके, धरणे, कारंडे, करे, कोकरे, कोळगिर, कोळेकर, गडदे, गावडे, गोरड, होडगिर, धुळगंडे, भोरगिर, नरवटे, कर्ले, जानकर, थोरात, धायगुडे, देवकर, देशमुख, घुगरे, देवकाते, पडळकर, पाटील, पांढरे, पुणेकर, पोले, भिसे, मसरक, माने, मार्कंड, मार्कडे, मासाळ, मासुळे, मेमाणे, मोरे, लवटे, लोखंडे, मस्के, वडकुते, वलेकर, वलकर, वाघमारे, वाघमोडे, शिंगाडे, शिंदे, सरोदे, सरगर, सदगर, सलगर, सापनर, सुरनर, राऊतराय, सूळ, सोलणकर किंवा सोनवलकर, हंडे, हराळ, मारकड, हाके, होडबे,दडस(पुजारी ), हापगुंडे आहेत.
- काही हटकरांना पाटील, राव, नाईक, देशमुख, राजे, मानकरी या उपाध्या आहेत.