हळवा (पशुरोग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हळवा (इंग्रजी-बॉट्युलिझम) हा जनावरांना जिवाणूंच्या बाधेमुळे होणारा एक रोग आहे.तो रोग बाधित खाद्य व पाण्याचे सेवनामुळे जनावरांत उद्भवतो.

इतर नावे[संपादन]

लागण[संपादन]

सडलेला चारा,डबक्यातील साचलेले घाण पाणी अथवा दोषयुक्त खाद्य जनावरांना खाण्यास दिल्यामुले याची लागण होते.

लक्षणे[संपादन]

या रोगात जनावराचा कंबरेपासूनचा मागचा भाग व पाय लुळा पडतो.जनावराचा शेपटीवरचा ताबा सुटतो.टांचणी अथवा सुईने अशा भागावर टोचले असता, तो भाग निर्जीव झाल्यागत, जनावर काहीही प्रतिक्रिया देत नाही.जनावरास ताप रहात नाही उलट, त्याचे शरीर थंड पडते.

औषधोपचार[संपादन]

प्राण्यास विषबाधा झाली काय ते पशुवैद्यक डोक्टरांचे सल्ल्याने तपासावे व योग्य ते औषधोपचार करावेत.

प्रतिबंधक उपाय[संपादन]

जनावरास नेहमी स्वच्छ व ताजे पाणी पाजावे.सडके घाणेरडे पदार्थ, खाद्य,पालापाचोळा इत्यादी गुरांना खाण्यास देऊ नये. एखाद्या खाद्यपदार्थाच्या शुद्धतेबद्दल शंका असल्यास, ते खाद्य देणे टाळावे.विनाकारण चाचणी करू नये.

हेही बघा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]