हलाम, नेब्रास्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Hallam, Nebraska Main from Harrison 2.JPG

हलाम हे अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील गाव आहे. लिंकन शहराजवळच्या या गावाची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार २१३ होती.

या गावाची स्थापना १८९२मध्ये झाली. त्यावेळी शिकागो, रॉक आयलंड अँड पॅसिफिक रेलरोड हा रेल्वेमार्ग येथपर्यंत आला.[१][२] येथील पहिल्या रहिवाशांपैकी एकाचे मूळ गाव असलेल्या स्वित्झर्लंडच्या हलाऊ गावाचे नाव यास देण्यात आले.

२००४ टोरनॅडो[संपादन]

मे २००४मध्ये एफ४ प्रतीचा टोरनॅडो हलाम गावावर आला होता. यात एका व्यक्तीचा मृत्यू तर ४० अधिक जखमी झाले. हा टोरनॅडो ४ किमी रुंदीचा होता. आजतगायत झालेल्या टोरनॅडोंमधील हा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात रुंद टोरनॅडो समजला जातो. [३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Hallam, Lancaster County". Center for Advanced Land Management Information Technologies. 19 August 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Burr, George L. History of Hamilton and Clay Counties, Nebraska, Volume 1. p. 126.
  3. ^ Gaarder, Nancy. "Nebraska's deadly Hallam tornado no longer widest on record". Omaha World-Herald. 2013-06-05. Retrieved 2013-06-28.