हर्षी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हर्षी हे यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील एक गाव आहे.सन २०११ च्या जनगणनेनुसार, या गावाची लोकसंख्या ३०७३ इतकी आहे.ज्यापैकी, १५९८ पुरुष व १४७५ स्त्रिया आहेत.या गावाचा शिक्षणदर ७४% आहे.[१]

या गावाला महाराष्ट्र शासनाचा जलसिंचनाचा प्रथम पुरस्कार देण्यात आलेला आहे.या गावाने जलसिंचनाचे योग्य नियोजन करून व हे गाव टँकरमुक्त करून हा पुरस्कार पटकावला.याकरीता सर्व गावकऱ्यांनी एकजूटीने काम केले व गावानजिक मोठे तलाव बांधून पाणी अडविले. त्यामुळे भूजल पातळी वाढली व हे गाव टँकरमुक्त झाले.

तसेच या गावाने 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा' पुसद तालुक्यातील दुसरा पुरस्कारही मिळविला.

संदर्भ[संपादन]

  1. ^ विकिव्हिलेज हे संकेतस्थळ[permanent dead link]