हरिद्र
Appearance
हरिद्र, पिवळा पक्षी, किवकिवा (इंग्लिश:Indian Golden Oriole) हा एक आकाराने मैनेएवढा पक्षी आहे.
पंख तसेच शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी आहे. डोळ्यांपासून गेलेली काळी रेषा ठळक दिसते आणि मादी मंद पोपटी रंगाची असते.
वितरण
[संपादन]आसाम सोडून पूर्ण भारतभर हे पक्षी स्थलांतर करतात. हिमालयात ५,००० फुटापर्यंत व पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकामध्ये निवासी असतात.
निवासस्थाने
[संपादन]पानगळीची आणि निम-हरीतपर्णी वने, वनराया आणि उद्याने या ठिकाणी राहतात.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली