हमाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पैशाच्या मोबदल्यात डोक्यावरून किंवा पाठीवरून ओझे इकडून तिकडे नेण्याऱ्या व्यक्तीला हमाल, कूली, भारवाही किंवा भारवाहक म्हणतात. त्यांना त्याकामासाठी जे पैसे मिळतात त्यांना हमाली म्हणतात. असे हमाल रेल्वे स्थानक, बस स्थानक, धान्य बाजारात, हमाल अड्ड्यांवर किंवा विमानतळावर असतात. विमानतळावरील हमालांना लोडर म्हणतात.

भारतातील रेल्वे स्थानकांवरील हमालांच्या अंगावर लाल डगला व छातीवर बिल्ला असतो. हे हमाल रेल्वेने नेमलेले असतात. प्रवासाला जाणाऱ्या उतारूचे सामान स्थानकामध्ये आत आणून ते रेल्वे डब्यात चढवणे आणि प्रवासाहून आलेलेल्या उतारूचे सामान डब्यातून खाली उतरवून ते स्थानकाबाहेर आणणे याव्यतिरिक्त या हमालांना रेल्वे पार्सलांची वाहतूकही करावी लागते. सामान जर जास्त असेल तर ते वाहून नेण्यासाठी रेल्वे स्थानकावर दोन चाकी हातगाडी असते.