हटकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

मराठी मध्ये हट म्हणजे जिद्दी आणि कर म्हणजे करणारा, म्हणजेच हट्ट करणारा. हटकरांना हट्टीकारा, बाराहट्टी, बरहट्टी, झेंडे, बंडगर, बंडे, बर्गी धनगर, बारगीर या ना्वांनीसुद्धा ओळखले जाते.

तसेच काही हटकरांना पाटील, राव, नाईक, देशमुख, राजे या उपाध्या आहेत.

Captain Fitzgerald यांच्या मते उत्तर हिंदुस्थानातून १३ व्या आणि १४ व्या शतकात महाराष्ट्रात बारा कुळींचे लोक एकत्र आले आणि त्यांनी एक बारा-हट्टी गाव तयार केले. त्याला बारा हट्टीचा देश म्हणू लागले. सध्या या भागाला हिंगोली आणि आजूबाजूचा परिसर म्हणून ओळखले जाते, आणि यावरूनच पुढे हटकर असे नाव पडले. "१४ व्या शतकात जेव्हा निजाम दख्खनचा सुभेदार म्हणून आला होता त्याच काळात हटकरसुद्धा आले आहेत असे ते म्हणतात" सर्व हटकर हे मेंढीपालन करतात, ते जेव्हा कधी मोहिमेवर जातात तेव्हा हातात एक भाला आणि सात हात लांब घोंगडी घेऊनच निघतात.त्यामुळे त्यांना बर्गी धनगर आणि बारगीर सुद्धा म्हटले जाते. हटकरांचा स्वभाव हा हट्टी आणि भांडखोर आहे.

अकबराने 'ऐन-ए-अकबरी' नामक ग्रंथात हटकरांचा उल्लेख केला आहे तो असा "हटकर हे स्वाभिमानी आहेत, ही राजपुतांची पराक्रमी आणि घमंडी प्रकारची जात आहे. त्यांनी बाशीम (सध्याचे वाशीम) येथे सशस्त्र सेना तयार केली आहे त्यांच्याकडे १००० घोडदळ आणि ५००० पायदळ सैन्य आहे. त्यांनी आजूबाजूचे राज्य आणि किल्ले कब्जात ठेवले आहेत. त्यांना धनगर पण म्हणतात पण ते राजपूत आहेत आणि हे खरे आहे.

निजामाच्या राज्यात यांचा दरारा आहे. आणि ब्रिटिशांच्या काळात त्यांना सतत युद्धाला उभे राहणारे आणि बंड करण्यात कुख्यात आहेत, असेच समजले जाते. हटकरांमध्ये युद्धात छातीवर वार घेणे आणि शहीद होणे ही अभिमानाची गोष्ट समजली जाते. हटकरांमध्ये मिश्या कधी कापत नाहीत. मिश्या ठेवणाऱ्यांना मान दिला जातो. हटकर पुरुष हे शारीरिक दृष्ट्या धष्ट-पुष्ट, स्वतंत्र राहणारे, आणि स्वाभिमानी असतात. हटकरांना भटके असेही म्हटले जाते. महाराष्ट्रात आल्यावर यांचा मुख्य व्यवसाय मेंढपाळ हा आहे. पण मुळचेच शूर असल्यामुळे यातील काही सैन्यात भरती झाले आणि काहींनी गावातील प्रशासनात सहभाग घेतला.

हटकरांचा ध्वज: हटकरांचा स्वतःचा वेगळा ध्वज असतो, निजामाच्या काळात हटकरांची संख्या अधिक होती. त्यांच्या लष्करी पेशाला शोभेल असा झेंडा त्यांच्याकडे असे, झेंड्याचा वरील भाग हा पिवळा असून खालच्या बाजूला तो लालसर रंगाचा असे. समाजातील कुठल्याही सामाजिक कार्यात, किंवा युद्धाच्या वेळ हटकर स्वतःचा झेंडा घेऊनच निघतात. इतिहासात अशाच प्रकारचे झेंडे दोन साम्राज्यांचे आहेत. एक म्हणजे दक्षिणेतील विजयनगरच्या साम्राज्यातील वडियार घराण्याचे म्हैसूरचे राज्य. त्यांचा झेंडा तंतोतंत असाच आहे. आणि दुसरे म्हणजे राजस्थान आणि पंजाब मधील भाटी राजपुतांच्या राज्याचे झेंडे. हे झेंडे रंगाने मिळते जुळते आहेत.[१] [२][३][४][५] [६][७]

  1. ^ परभणी दर्शनिका
  2. ^ Ain-e-Akbari
  3. ^ Washim District Wikipedia
  4. ^ People Of India :Maharashtra-Volume 2
  5. ^ The Castes and tribes of H.E.H. the Nizam’s Dominions – Volume 1
  6. ^ vijaydhankate.blogspot.in/2010/12
  7. ^ The Indian Encyclopaedia: Biographical, Historical, Religious -Volume