Jump to content

स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना २०२३ ( शेतकरी अपघात विमा योजना 2023 | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना | शेतकरी अपघात विमा योजना | गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना)

केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्यातील सरकार जनतेच्या कल्याणासाठी आणि नागरिकांच्या सुविधेसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवितात, या योजनांच्या माध्यमातून सरकार राज्यातील जनतेला विविध आरोग्य सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना व राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी पेन्शन योजना, त्याचप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकार अनेक प्रकारच्या सुविधा आणि योजना तयार करतात आणि या योजनांची अंमलबजावणी अशा रीतीने केली जाते कि या योजनांचा लाभ तळागाळातील म्हणजेच राज्यातील सर्वात गरीब शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्यात येतो, शेती व्यवसाय करतांना शेतकऱ्यांबरोबर अनेक प्रकारचे अपघात होण्याची शक्यता असते कारण शेतामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात, पावसाळ्यामध्ये त्यांना विजेची भीती असते कारण शेतकरी शेतीत सतत काम करत असतो.

शेती व्यवसाय करतांना होणाऱ्या अनेक प्रकारच्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेच्या अंतर्गत विमाछत्र प्रदान करण्यात आले असून, या योजनेच्या अंतर्गत विम्याचा लाभ शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाना देण्यात येतो. या योजनेंतर्गत, शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य, आई-वडील, शेतकऱ्याचे पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी, 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. वाचक मित्रहो आज आपण महाराष्ट्र शासनाची महत्वपूर्ण योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023 संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2023 संपूर्ण माहिती

[संपादन]

वीज, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धोका, रस्ते अपघात, वाहन अपघात यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात, तसेच शेती व्यवसायादरम्यान इतर कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा काही शेतकरी अपंगत्वास कारणीभूत ठरतात. अपघात ज्यामुळे कुटुंबाचा कमावणारा माणूस मारला जातो. अशा शेतकरी कुटुंबाला अशा मृत्यूमुळे किंवा अपंगत्वामुळे कुटुंबावर वाईट आर्थिक परिस्थिती निर्माण होऊन त्यांना अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अशाप्रकारच्या परिस्थतीत मदतीचा भक्कम आधार मिळावा या महत्वपूर्ण उद्देशाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे.

बहुतांश राज्यातील अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असते त्यामुळे शेतकरी, स्वतःचा विमा काढू शकता नाही. तसेच शेती हा व्यवसाय करतांना त्यांना अनेक प्रकारच्या अपघातांना समोर जावे लागते आणि अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात  विमा योजना सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला.

या योजनेंतर्गत, शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य, आई-वडील, शेतकऱ्याचे पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी, 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण 2 व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना जीआर

[संपादन]

2020-21 या वर्षासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 10-12-2020 ते 9-10-2021 या कालावधीसाठी लागू करणे आवश्यक होते. तसेच काही प्रशासकीय कारणांमुळे प्रस्तुत योजना 10-12-2020 पासून लागू होऊ शकली नाही. आणि त्याची सुरुवात 6-4-2021 पासून झाली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत 10-12-2020 ते 6-4-2021 या कालावधीत प्राप्त झालेल्या प्रस्तावांना संदर्भ क्रमांक 6 नुसार विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

योजनेच्या अटी व शर्तींनुसार पहिल्या टप्प्यात मागणीनुसार प्राप्त झालेल्या 1185 प्रस्तावांसाठी 168 मृत्यू आणि 17 अपंगांसाठी 23.53 कोटी रुपयांची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र प्रस्तावांसाठी आयुक्त कार्यालयाने केलेल्या मागणीच्या अनुषंगाने व योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला सुधारित अंदाजपत्रक विचारात घेऊन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अंतर्गत रु.7.28 कोटी वितरीत करण्याचे प्रकरण विमा योजना शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासनाने 31 मार्च 2022 रोजीच्या बैठकीत पुढील शासन निर्णय घेतला.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अपडेट्स

[संपादन]

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना:हि योजना विमा कंपनी अंतर्गत सन 2021 - 22 पर्यंत राबविण्यात येत होती. परंतु आता दि. 19 एप्रिल 2023 रोजी निर्गमित शासनच्या निर्णयानुसार, ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ या सुधारित योजनेची अंमलबजावणी करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ प्रदान करण्याकरीता वहितीधारक शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील,शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणीही एक व्यक्ति) असे एकूण दोन जणांकरिता योजना राबविण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले आहे.

विमा कंपन्या तसेच विमा सल्लागार कंपन्याकडून योजनेची व्यवस्थित अंमलबजावणी केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाने पूर्वीची विमा योजना बंद करून सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. ही नवी योजना प्रत्येक दिवसाच्या 24 तासांसाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे योजनेतील पात्र व्यक्तिला कधीही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु यामध्ये शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी सुरू असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास या नवीन योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.

अपघातग्रस्त शेतकऱ्या संबंधित सुरुवातीला माहिती प्राप्त झाल्यानंतर, सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे पथक प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करून त्याबाबतचा अहवाल तहसिलदार यांना घटना घडल्यापासून 8  दिवसांच्या आत सादर करतील. त्यानंतर तालुक्याचे कृषी अधिकारी प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव संबंधित तहसिलदार यांना सादर करतील. त्यानंतर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठकीमध्ये 30 दिवसांच्या आत संबंधित शेतकरी/शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यात येऊन संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेमार्फत संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/वारसदारांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना उद्देश्य

[संपादन]

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ज्या शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना अपघात झाला, परिणामी त्यांचा मृत्यू किंवा अपंगत्व येऊन कुटुंबावर उपासमारीची वेळ आली तर अशावेळी त्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून कुटुंबातील कमावता प्रमुख मरण पावला किंवा अपंग झाला तर कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार नाही.

हि योजना शासनाने शेतकरी सामाजिकदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या बळकट झाला पाहिजे या उद्देशाने गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना व त्यांच्या परिवारांना संकट कालावधीत विमा संरक्षण मिळावे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि संकट काळात त्याना आधार देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने आणि मजबूत बनविण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दुर्दैवाने जर अपघात झाल्यास शेतकऱ्याला स्वतःच्या उपचारासाठी किंवा दुसऱ्या कोणत्याही गरजेसाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहावे लागू नये आणि कोणाकडून कर्ज घेण्याची गरज पडू नये या महत्वपूर्ण उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे भविष्य उज्ज्वल करणार आहे आणि या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निष्कर्ष

[संपादन]

भारत हा कृषी प्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात शेतीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते. अनेकवेळा, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी, महाराष्ट्र सरकार गोपीनाथ मुंडे शेतकरी आपघात विमा योजना अंतर्गत आर्थिक मदत करत आहे. त्यानुसार, शेती करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयांना भरपाईच्या स्वरूपात मदत दिली जाते. या योजनेच्या माध्यमातून शेती करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाखांपर्यंत किंवा अपंगत्व आल्यास 1 लाखांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते.