Jump to content

स्पाँडिलोसिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्पाँडिलोसिस किंवा सर्व्हायकल स्पाँडिलोसिस म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ, मानेच्या मणक्यांमधील गादीचे (यांना मणक्यांमधील चकत्या म्हणतात) खराब होणे, बाहेर येणे आणि त्याच्यावर कॅल्शियम साठून राहणे.

मानेत एकूण सात मणके असतात. त्यांच्या साह्यानेच आपण मानेच्या हालचाली करू शकतो. या मणक्यांची झीज झाल्याने सर्व्हायकल स्पाँडिलिसिस उद्भवतो. यात मणक्यांतील अंतर कमी होणे, गादी झिजणे, मणका जागेवरून सरकणे (स्पाँडिलिस्थेसिस). नस दबली जाणे (नर्व्ह क्रॉम्प्रेशन) असे आजार यात होऊ शकतात. सर्व्हायकल स्पाँडिलिसिस या आजारात मानदुखी, पाठदुखी, डोकेदुखी येते. 

स्पाँडिलिसिसची लक्षणे

[संपादन]
  • मान दुखणे, भोवळ येणे.
  • पूर्णपणे मान वळवता न येणे.
  • एक किंवा दोन्ही हातात मुंग्या येणे.
  • हात बधीर होणे, क्वचित डोकेदुखी.
  • हाताने वस्तू उचलता न येणे.

स्पाँडिलिसिसची कारणे

[संपादन]
  • सततचा वाहनांवरून प्रवास.
  • कॉम्प्युटर/ मशीनवर काम करणे.
  • व्यायामाचा अभाव,
  • ओझे उचलणे.
  • मानेवर आघात
  • कॅल्शियमची कमतरता

स्पाँडिलिसिसची उपचार

[संपादन]
  • औषधोपचार-वेदनाशामक औषधांनी तात्पुरते बरे वाटते.परंतु नंतर पुन्हा त्रास सुरू होतो.
  • कॉलर बेल्ट
  • व्यायाम
  •  मसाज 
  • आयुर्वेदिक औषधे
  • पंचकर्म-नस्यकर्म-नाकात विशिष्ट पद्धतीने औषधी द्रव्य सोडण्याची पद्धत, मन्याबस्ती-मानेवर औषधीद्रव्यांचे पाळे तयार करून त्यात औषधीयुक्त तेल सोडतात.

स्पाँडिलिसिसमध्ये काय काळजी घ्याल

[संपादन]
  • डोक्याखाली जाड उशी घेऊ नये,
  • अधिक प्रवास,
  • ओझे उचलणे टाळावे.
  • योगा किंवा व्यायामास सुरुवात करावी .
  • कॉम्प्युटरवर काम करणाऱ्यांनी ठराविक वेळेनंतर मानेच्या हालचाली कराव्यात.
  • आहारात कॅल्शियम व फॉलकि अ‍ॅसिडयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
  • मान जास्तवेळ पुढच्या किंवा एका विशिष्ट कोनात झुकवून कामे करणे टाळावे.

व्यायाम प्रकार

[संपादन]
  • हलासन, धनुर्वासन, चक्रासन, मत्स्यासन, भुजंगासन, नौकासन, उत्तरासन, उशत्रासान इ.

एकट्या भारतात दरवर्षी १ कोटीपेक्षा जास्त लोक स्पॉडिलिसिस आजारामुळे प्रभावित आहेत. मान दुखी, कमजोरी, खांद्ये, हात आणि बोट सुन्न पडणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मान हलविताना त्राास होणे इत्यादी लक्षण आहे. हे एक डिजनरेटिव डिजीज आहे. यात वयानुसार स्पाईनल डिस्कमध्ये परिवर्तन होत असतो. परिवर्तनामुळे कंबर दुखी किंवा मान दुखी होत असते. यामुळे ऑस्टियोअर्थराईटिस होऊ शकतो. तसेच हे कार्टिजेल ला नुकसान पोहचवू शकते. मध्यम वर्गातील युवा मध्ये या डिजनरेटिव बदलावा बरोबर चवथ्या आणि सातव्या सर्वाईकल वर्टेब्रे सर्वात जास्त प्रभावीत होत असते. एक दशकाअगोदर सवाईकल स्पाँडिलिसेस (सीवी) हे वयाशी संबंधित होते. तसेच ६० वर्षापेक्षा पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्येच हे पाहिले जात होते. मानेची हडी वाढत्या वयबरोबर कमजोर होत असते. डिस्क स्पेस आणि हड्डी घासल्याने सीवी होत असतो. पंरतू आज ४० वयापेक्षा कमी लोकांनाही हा रोग होऊ लागला आहे. एकट्या भारतात दरवर्षी १ कोटीपेक्षा जास्त लोक स्पॉडिलिसिस आजारामुळे प्रभावित होत आहे. एका अंदाजानुसार वयस्करामध्ये मानदुखीचे वार्षिक प्रमाण २० ते २५ टक्के आहेत. सीवी महिला आणि पुरुषांमध्येही आढळून येतो. परंतु सर्वात जास्त गंभीर स्थिती पुरुषांमध्ये आढळून येते. ज्येष्ठ नागरिक वृद्धामध्ये पाठीचा कणाची समस्या सर्वात जास्त दिसून येते. एका अंदाजेनुसासर ५० वर्षापेक्षा अधिक वयाचे ७० टक्के लोकांमध्ये स्पाईनल cervical vertebra चे संकुचन किंवा इंटरवर्टेब्रल फोरैमिना होत असतो. आणि यामधून ५० टक्के प्रकरणात सवाईकल स्पाईन मध्ये स्पाँडिलोटिक परिवर्तन, तसेच १५-४० टक्के रुग्णांमध्ये सॉलिटरी डिस्क स्पेस चे परिवर्तन होत असते. तसेच ८०-८५ टक्के रुग्णांमध्ये अनेक स्तरावर बदल होत असते. तर १० टक्के रुग्णांवर बोन डिफॉरमेटी जन्मजात असतो.

सवाईकल स्पाईन चे डिजनरेशन होत असतो. सर्वाइकल वरर्टेबाई बरोबर काटिलेज खराब होत असतो. तसेच मोठे होत असतात. हे सर्व वायाशी संबंधित आहे. पंरत आता युवामध्येही सीवी चे प्रकरण अचानक समोर येण्याचे कारण म्हणजे खराब पॉश्चर आहे. युवा वर्ग आपले काम पीसी किंवा लॅपटॉपवर करतात. जास्तीत जास्तवेळी स्क्रिनवर खाली पाहणे किंवा वर पाहणे हा प्रकार होत असतो. मात्र हे दोन्ही स्थिती चुकीचे आहे. जेव्हा मानेचे पोश्चर चुकीचे असते. त्यावेळी खूप समस्या उत्पन्न होत असते.

संदर्भ

[संपादन]