स्नॅपचॅट
प्रकार | खाजगी कंपनी |
---|---|
संस्थापक | त्इवान स्पीगल, बॉबी मुर्फी, रेगी ब्राउन. |
मुख्यालय | अमेरिका |
संकेतस्थळ | https://www.snapchat.com/ |
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
स्नॅपचॅटची निर्मिती त्इवान स्पीगल, बॉबी मुर्फी आणि रेगी ब्राउन या स्टॅनफोर्ड विद्यापीठातील माजी विद्यार्थीयांनी सप्टेंबर २०११ मद्धे केली, स्नॅपचॅट द्वारे फोटो व्हिडिओ शेअर करता येतात, पोस्टद्वारे अनेक सदस्य एकमेकांना संदेश पाठवू शकतात, स्नॅपचॅटमध्ये वेगवेगळी फिल्टर्स उपलब्ध आहेत. यात फोटोची मांडणी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, २४ तासांनंतर ते फोटो नाहीसे होतात. फेब्रुवारी 2018 पर्यंत स्नॅपचॅटमध्ये 187 दशलक्ष दैनिक सक्रिय वापरकर्ते आहेत. [१] डिसेंबर 2012 मध्ये व्हिडिओ स्नॅप पाठविण्याची सोय उपलब्ध ॲपच्या माध्यमातून करून देण्यात आली, ॲपच्या आत फोटो बटण दाबून, लांबीच्या दहा सेकंदांचा व्हिडिओ कॅप्चर केला जाऊ शकतो. आणि एकदा पाहिल्यानंतर व्हिडिओ अदृश्य होतो. [२] त्यानंतर १ मे २०१४ आलेल्या अपडेट नंतर यामद्धे व्हिडीओ चॅटद्वारे संवाद साधने तसेच थेट संदेश पाठवणे या सुविधा उपलब्ध झाल्या. [३] त्यानंतर जुलै २०१४ मद्धे जिओ फिल्टर्स नावाची सुविधा उपलब्ध झाली यानुसार वापरकर्त्याला एखाद्या विशिष्ट भौगोलिक स्थानाला, शहराला, कार्यक्रमाला चित्रासोबत जोडता येऊ लागले. [४][५]
इतिहास
[संपादन]रेगी ब्राउन यांनी इव्हन स्पिगल यांना अदृश्य चित्रांच्या प्रयोगाची कल्पना दिली, नंतर ब्राउनी आणि स्पिगलने कोडींगचे ज्ञान असणाऱ्या बॉबी मर्फीला सोबत घेतले, तिघांनी काही महिने एकत्र काम केले ८ जुलै २०११ रोजी आयओएस ऑपरेटिंग सिस्टमवर स्नॅपचॅट "पिकाबू" म्हणून लॉन्च केले. लॉन्च झाल्यानंतर कंपनीच्या काही महिन्यांनंतर रेगी ब्राउन याला बाहेर काढण्यात आले. सप्टेंबर २०११ मध्ये ॲप स्नॅपचॅट म्हणून पुन्हा लॉन्च करण्यात आले आणि स्नॅपचॅट टीमने त्यानंतर हाताळणी आणि तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित केले. [६] [७]
८ मे २०१२ रोजी, रेजी ब्राउन यांनी इवान स्पिगेल यांना एक ईमेल पाठविला ज्यामध्ये त्यांनी कंपनीच्या मालकीबाबतच्या त्याच्या शेअरची पुन्हा चर्चा करण्याची ऑफर दिली. त्यावर स्नॅपचॅटच्या वकीलांनी असा दावा केला की रेगी ब्राउन यांचा उत्पादनाशी कधीही रचनात्मक संबंध नव्हता, आणि असे निष्कर्ष काढले की रेगी ब्राउनने किमतीत मोजण्यासारखे कोणतेही योगदान दिले नाही आणि म्हणूनच ते काहीच नाही. सप्टेंबर २०१४ मद्धे ब्राउनने $ 157.5 दशलक्षची तडजोड केली आणि त्याला मूळ लेखकांपैकी एक म्हणून श्रेय दिले गेले. [८]
स्नॅपचॅट फिल्टर्स आणि लेन्सेस
[संपादन]- स्नॅपचॅट फिल्टर्स : स्नॅपचॅट फिल्टर्समद्दे तुम्ही रहात असाल ते शहर, प्रसिद्ध ठिकाणे, जागा अशा जागांबद्दल तुम्ही एक कम्युनिटी फिल्टर यामद्धे तयार करण्याची सुविधा उपलब्ध आहे, फिल्टरमध्ये रंग, जागा, वेळ, वेग, तापमान इत्यादी बाबी नोंद होतात.
- स्नॅपचॅट लेन्सेस : लेन्सेस हे व्हिडिओ आणि फोटोंना देता येणारे विविध स्पेशल इफेक्ट आहेत यात प्रामुख्याने ॲनिमेशनचा उपयोग होतो, लेन्सेस मुळे मुळ फोटो मद्धे बदल होतो.
विवाद
[संपादन]- स्नॅपचॅट हॅक डिसेंबर, २०१३ - ३१ डिसेंबर, २०१३ रोजी स्नॅपचॅट हॅक करण्यात आलं. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियातील सुरक्षा कंपनी गिब्सन सिक्योरिटीने २७ ऑगस्ट २०१३ रोजी स्नॅपचॅट कंपनीला त्यांची एपीआय सुरक्षा कमजोर असल्याचा केला होता, हॅकर्सने "स्नॅपचॅटडीबी.इन्फो" नावाच्या वेबसाइटवर अंदाजे 4.6 दशलक्ष स्नॅपचॅट वापरकर्त्यांची नावे आणि फोन नंबर प्रकाशित केला, त्यानंतर स्नॅपचॅटवर सार्वजनिक दबाव आला आणि एका आठवड्यात स्नॅपचॅटने माफी मागितली. [९]
- गरीब देश - स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पिगेल यांनी भारत तसेच स्पेन हा गरीब देश असुन स्नॅपचॅट हे केवळ श्रीमंत देशांसाठी बनवलं गेलं असल्याचं वक्तव्य केलं होत, त्यानंतर अनेक भारतीयांनी हे ॲप मोबाइल मधून काढून टाकून त्याला एक स्टार रेटिंग दिली त्यामुळे गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग घसरलं आणि त्याचे शेअर १.५ पर्यंत घसरले, त्यानंतर स्नॅपचॅटने हे ॲप सर्वांसाठी आहे आणि सर्वजण विनामूल्य डाउनलोड करू शकतात असे निवेदन प्रसिद्ध केले. [१०]
२०१८ वापरकर्त्यामद्धे घट
[संपादन]स्नॅपचॅटने २०१८ यावर्षी तिसऱ्या तिमाहीत सुमारे 2 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते दररोज गमावले आणि आता 186 दशलक्ष वापरकर्ते आहेत जे १९१ दशलक्षांवरून खाली आहे. फेसबुकच्या मालकीचे इंस्ताग्राम आणि व्हाट्स अपच्या स्टोरी या अपडेट मुळे स्नॅपचॅटचे वापरकर्ते सातत्याने घटत चालले आहेत. ४०० मिलियन लोक दररोज इस्ताग्राम स्टोरीचा वापर करतात तर ४५० मिलियन लोक दररोज व्हाट्सअप स्टेटसचा वापर करतात. [११]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Snap shares skyrocket on first earnings beat with revived user growth". TechCrunch (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ Colao, J.J. "Snapchat Adds Video, Now Seeing 50 Million Photos A Day". Forbes (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "Real talk: the new Snapchat brilliantly mixes video and texting". The Verge (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "Snapchat Turns Geofilters Into An Ad Unit". TechCrunch (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "हलकंफुलकं माध्यम स्नॅपचॅट". divyamarathi. 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "The alleged betrayal described in these photos, texts, and emails cost Snapchat $158 million". nordic.businessinsider.com. 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "Snapchat's Spiegel Admits Brown "Came Up With The Idea For Disappearing Picture Messages" In New Court Documents". TechCrunch (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ Masunaga, Samantha. "What happened to ousted Snapchat founder Reggie Brown? No, really, we don't know". latimes.com. 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "Snapchat Finally Apologizes After 4.6 Million User Phone Numbers Leak - Here's How To Make Sure It Doesn't Happen Again". Business Insider. 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "गरीब भारतीयांकडून 'स्नॅपचॅट'च्या सीईओला जशाच तसं उत्तर!". News18 Lokmat. 2018-11-02 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "Snapchat to run out of money losing $1.5 bn in 2019 as user growth stalls: Report- Technology News, Firstpost". Tech2 (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.