स्तनदाह (पशुरोग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

स्तनदाह अथवा काससुजी हा प्राण्यांमधे, विशेषतः, दुधाळू जनावरांमध्ये आढळणारा एक रोग आहे.या रोगाचा उद्भव जनावरांच्या स्तनाग्रातून सुक्ष्म जंतूंचा कासेत शिरकाव झाल्यामुळे होतो.सडास(स्तनाग्रास) अथवा कासेस(स्तनास) जर एखादी जखम झाली तर त्याद्वारे आत या जंतूंचा प्रवेश होतो.तेथे जंतूंची वाढ झपाट्याने होते.

इतर नावे[संपादन]

यास 'काससुजी' असे स्थानिक भाषेतील नाव आहे.

लागण[संपादन]

दूध काढण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे व सोबतच तेथे झालेल्या जखमेमुळे असे होऊ शकते.

लक्षणे[संपादन]

जनावराचे दूध देण्याचे प्रमाण कमी होते. कास गरम होते व सुजते. सडातून रक्तमिश्रित दूध येते.दूधात गुठळ्या तयार होतात.यास योग्य वेळी उपचार केले नाही तर कास दगडासारखी कठिण होऊन ती निकामी होते.जनावर दूध दोहण्यासाठी कासेला हात लावू देत नाही.

औषधोपचार व इतर काळजी[संपादन]

कासेतील दूध पूर्ण काढावे.सडाची/स्तनाग्राची छिद्रे जर बंद झाली असतील तर निर्जंतूक केलेली 'दूध नळी' सडामध्ये अलगद सरकवावी व कासेतील दूध पूर्ण काढून कास मोकळी करावी.कास व सड पोटॅशियम परमॅग्नेटच्या गुलाबी पाण्याने धुऊन काढावेत.पशुवैद्यकीय डॉक्टरांचे सल्ल्याने आवश्यक ती औषधे/मलम सडात सोडावे. अशी औषधयोजना केल्यावर किमान ४८ तास दूधाचा पिण्यासाठी वापर करू नये व पिल्लासही दूध पिण्यास देउ नये.

प्रतिबंधक उपाय[संपादन]

स्तनदाह झालेले जनावर इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.दूध काढणाऱ्या व्यक्तीची नखे वाढलेली नसावीत.दूध काढतांना अंगठा मुडपलेला/दुमडलेला नसावा, त्याने स्तनाग्रास ईजा होण्याचा संभव असतो.

हेही बघा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]