Jump to content

स्टेथोस्कोप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Stethoscope; Стетоскоп; ၶိူင်ႈထွမ်ႇၶူင်းၼႂ်း; Stetoskop; ستەتوسكوپ; ستِتوسکوپ; Стетоскоп; Stetoskop; صدربین; Fonendoskop; Estetoscòpi; 聽診器; Stetoskopo; Stetoskop; Стетоскоп; Stetoskopo; Стетоскоп; Stetoskop; স্টেথোস্কোপ; stéthoscope; מסכתא; स्टेथोस्कोप; Stetoskop; Ống nghe; ستەتوسكوپ; Stetoskop; Стетоскоп; Estetoscópio; 听诊器; Стетоскоп; stetoskop; stetoskop; Stetoskop; מסכת; 听诊器; ಸ್ಟೆತೋಸ್ಕೋಪ್‌; stetoskoop; stethoscope; سماعة طبية; Selaouenner; Stetoskop; နားကြပ်; stetoskop; Stetoskop; સ્ટેથોસ્કોપ; 听诊器; fonendoskopio; Fonendoskop; Стетоскоп; fonendoscopi; Stethoskop; Stethoskop; Stetoskop; Стэтаскоп; گوشی پزشکی; 聽診器; stetoskop; स्टेथेस्कोप; 聴診器; stethoscopio; 聽診器; stetoskooppi; stetoskop; වෙදනලාව; Stethoscopium; स्पन्दमापिनी; स्टेथोस्कोप; 听诊器; stetoskohppa; Estetoskopyo; Stethoscope; stetoskopp; இதயத்துடிப்பு மானி; stetoscopio; Stetoskoop; стетоскоп; Ստետոսկոպ; stetoskoop; სტეტოსკოპი; stetoskåvppå; Beischltelefon; stethoscope; steiteascóp; stetoskops; estetoscópio; Stetoscop; fonendoszkóp; స్టెతస్కోప్; Stetoskopas; stetoskop; стэтаскоп; Stetoskop; Stétoskop; เครื่องฟังตรวจ; Stethoskopu; സ്റ്റെതസ്കോപ്പ്; stethoscoop; estetoscopio; سِٹیتھکوپ; Stetoskòp; 聽診器; Estetoscopio; стетоскоп; Στηθοσκόπιο; 청진기; aparato médico para la auscultación; orvosi műszer, kézi diagnosztikai eszköz; તબીબી ઉપકરણ; мэдычны прыбор; azterketa klinikoetan, organismoko errai edo aparatuek, bereziki bihotz- eta arnas aparatuek, sortzen dituzten hotsak auskultatzeko erabiltzen den tresna.; ၶိူင်ႈၸႂ်ႉ ​​မေႃယႃ တႃႇၸမ်ႈထွမ်ႇၼႂ်းတူဝ်; Прибор, который всегда с врачом; acoustic medical device for auscultation; Diagnosegrat k posudźowanju zwukowych fenomenow; Mjet per degjimin e tingujve trupore te njeriut; دستگاه پزشکی برای شنود صداهای درون بدن; 用於聽診的聲學醫療設備; აკუსტიკური სამედიცინო მოწყობილობა აუსკულტაციისათვის; lekársky nástroj, ktorý slúži na vyšetrovanie pacientov auskultáciou; Oskültasyon için kullanılan bir tıbbi cihaz; instrument acoustique pour l'écoute des sons internes du corps; instrument för att lyssna på hjärta, lungor och tarmar; narzędzie do osłuchiwania; מכשיר רפואי לשמיעת קולות תוך-גופניים; artsengereedschap om lichaamsgeluiden te beluisteren; ആന്തരാവയവങ്ങളുടെ ശബ്ദപരിശോധന നടത്താനുള്ള ഉപകരണം; instrument acostic; strumento medico; 질병의 진단을 하는 데 사용하는 의료 기기; acoustic medical device for auscultation; aparell utilitzat per a l'auscultació; Lékařský nástroj; Diagnosewerkzeug zur Beurteilung von Schallphänomenen im Innern von Hohlkörpern; fonendo; fonendoscopio; sztetoszkóp; estetoskopio; estetoskopioak; ၶိူင်ႈထွမ်ႇ; фонендоскоп; стетофонендоскоп; Phonendoskop; Palmoskopie; stetoskopi; استتوسکوپ; 听筒; 医用听筒; Stetoskopi; ფონენდოსკოპი; ステソスコープ; Stethoscope; स्यन्दमापिनी; స్టెతస్కోపు; stetoskohpa; Stetoskop; fonendoskopy; Fonendo; Fonendoscopio; Stetofonendo; stetofonendoscopio; stethoscope; фанэндаскоп; מסכת; स्टेथेस्कोप; estetoscopio; Stethoscope; Słuchawki lekarskie; Fonendoskop; Słuchawka lekarska; Stethoscope; סטתוסקופ; סטטוסקופ; Լսափողակ; Estetoscopi; phonendoscope; stethoscopes; سماعه طبيه; سماعة الطبيب; Фанендаскоп; Steteskop; Stetoskob
स्टेथोस्कोप 
acoustic medical device for auscultation
माध्यमे अपभारण करा
उच्चारणाचा श्राव्यअरबी भाषा
प्रकार
  • medical device type
उपवर्ग
  • diagnostic equipment
अनावरक (डिस्कव्हरर) किंवा शोधक
  • René Laennec
वापर
  • auscultation
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q162339
जीएनडी ओळखण: 4740648-3
एलसीसीएन ओळखण: sh85128062
बीएनएफ ओळखण: 11944277s
एनकेसी ओळखण: ph1235745
J9U ID: 987007536308305171
विकिडाटावर माहिती संपादित करा

हे एक वैद्यकीय अवजार आहे. याच्या साहाय्याने छातीतील फुप्फुस व ऱ्हदय यांचे परीक्षण करता येते.याच्या मध्ये

  1. कानात घालायचा भाग
  2. रबरी नळी
  3. डबी हे भाग असतात.

स्टेथोस्कोपचा शोध लागण्यापूर्वी छातीला कान लावून आवाज ऐकला जाई. याचा शोध डॉ.रेने लिनेक यांनी १८१६ साली पॅरिस मध्ये लावला.त्यांनी कागदाची पुंगळी तयार करून ती रुग्णाच्या छातीला कान लावून आवाज ऐकला.डॉक्टर म्हणले की डोळ्यासमोर येते ती पांढऱ्या एप्रनमधील गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून फिरणारी व्यक्ती. स्टेथोस्कोप हा डॉक्टरचा एक अवयवच असतो जणू. या स्टेथोस्कोपचा जन्म मोठय़ा मजेशीर प्रसंगी झाला. पूर्वी डॉक्टरमंडळी रुग्णाच्या छातीवर कान टेकवून आतील धडधड आणि घडामोडी समजावून घेत. त्या काळात रुग्ण खंगलेले शरीर घेऊन येत असे. यात बदल घडत गेले तसे डॉक्टरांचे काम कठीण होत गेले. त्यात पृथूला ते स्थूला अशा स्त्रिया रुग्ण म्हणून समोर आल्या की डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही अवघडल्यासारखं होई. १८१६ साली फ्रान्समध्ये रेने लेन्नाक (हा उच्चार वेगळाही असू शकतो, कारण फ्रेंच शब्द इंग्रजीत वाचून त्याचा मराठीत उच्चार केला आहे.) कडे एक अतिविशाल महिला आली. नेहमीच्या पद्धतीने कान टेकवून हृदयाची धडधड ऐकू येईना. रेनेचे प्रयत्न चालू आणि बाई अस्वस्थ होऊ लागल्या. शेवटी रेनेने आपल्याजवळील एका जाडसर कागदाची नळकांडी केली आणि एक टोक छातीवर टेकवून नळकांडीच्या दुसऱ्या टोकाशी कान लावला. अहो आश्चर्यम्! त्याला छातीतील आवाज स्पष्ट ऐकू आले. नंतर त्याच्या लक्षात आले की, छातीला कान लावण्यापेक्षा नळकांडीतून जास्त छान ऐकू येते. तर हा पहिला स्टेथोस्कोप. स्टेथो म्हणजे छाती आणि स्कोप म्हणजे चिकित्सा. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन त्याला नुसतेच स्टेथो म्हणायला सुरुवात झाली. पुढे त्याच्या रूपात बदल होत जाऊन डॉ. लिटमन यांनी बनवलेला स्टेथो आजकाल वापरला जातो. साधारणपणे छाती आणि पोटातील आवाज ऐकण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढे एक्स-रे, सोनोग्राफी, इको, सीटी आणि एम.आर.आय. इ. तपासण्या उपलब्ध होऊ लागल्या तसे स्टेथोचे महत्त्व कमी होत गेले. आता तर बऱ्याच वेळा स्टेथो हा डॉक्टरांचे व्हिझिटिंग कार्ड बनला आहे. कुठच्याही हॉस्पिटलमध्ये जाताना हातात स्टेथो असेल तर सरळ प्रवेश मिळतो, सिक्युरिटी गार्ड थांबवीत नाहीत. आय.सी.यू. किंवा ऑपरेशन थेटरमध्ये मात्र अजूनही स्टेथो खरोखर वापरला जातो. या स्टेथोच्या अनेक गमतीशीर गोष्टी बघण्यात येतात. खरेतर आजकाल पेशंटला विचारलेले प्रश्न आणि तपासण्या यावरून रोगनिदान होते. पण पेशंटचा स्टेथोवर इतका विश्वास असतो की, तो लावल्याशिवाय आपल्याला नीट तपासले आहे असे पेशंटला वाटतच नाही. अगदी औषध लिहून दिले आणि निघायची वेळ आली तरी कोणी सांगतोच ‘पण डॉक्टर ते तपासायचं राहिलंच की’.स्टेथोस्कोप कानात अडकवून दुसरे टोक पेशंटच्या छातीवर टेकवले की, आतील आवाज ऐकण्यासाठी डॉक्टर आणि पेशंट दोघांनीही गप्प राहण्याची गरज असते. बरे ह्या आवाजाची पत आणि प्रत समजण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. हिंदी सिनेमात तिजोरी फोडताना हिरो जसा कान देऊन ऐकतो तसे ऐकावे लागते. प्रत्यक्षात मात्र डॉक्टर इतक्या वेगात स्टेथोची जागा बदलतात की, त्यातून काही ऐकणे शक्यच होऊ नये. बरेचदा कानात स्टेथो, दुसरे टोक जलद गतीने पेशंटच्या छाती-पाठीवरून फिरते आहे, आणि त्याच सोबतीने डॉक्टर प्रश्न विचारताहेत आणि पेशंट उत्तरे पण देतो आहे. मल्टिटास्किंगचे इतके उत्तम उदाहरण दुसरे नसेल. बरे कानात स्टेथो असताना डॉक्टर उत्तरे ऐकतो कशी, हे पण मोठ्ठे कोडेच आहे. याहीपेक्षा मजेशीर गोष्ट. एका भोंदू डॉक्टरने आपल्या दुकानात विविध प्रकारचे स्टेथो लटकवून ठेवले होते. आमच्या कामवाल्या मावशी एक दिवस मला सांगू लागल्या की, मुलाला खोकला झाला होता तेंव्हा पहिले दोन दिवस दहा रुपयाच्या नळीने तपासून घेतले. मग शेवटी पंचवीसवाल्या नळीने पण तपासून घेतले तरी आराम पडेना. मग सरळ सरकारी दवाखाना गाठला. पण तिकडे एकदम मोठे डॉक्टर पण दहा रुपयाच्या नळीनेच तपासतात. मला ही दहावाली नळी आणि पंचवीसवाली नळी हा प्रकार कळेना. मग मी त्या दवाखान्यात गेलो तेंव्हा हा सगळा प्रकार मला कळला. आजकाल ही परिस्थिती बघितली तरी मला स्टेथो वापरून उत्तम रोगनिदान करणारे अनेक डॉक्टर्स माहित आहेत. त्यांचे रोगनिदान आधी होते आणि त्याची खात्री करून घेण्यासाठी पुढल्या तपासण्या असतात. कॉलेजमध्ये शिकत असताना डॉ. व्ही. आर. जोशी, डॉ. व्ही. व्ही. शानभाग, डॉ. राममूर्ती असे अनेक निष्णात डॉक्टर्स मी बघितले आहेत की, त्यांच्या हातातील स्टेथो रुग्णाच्या आतील बारीकसारीक घडामोडी त्यांच्या कानात मनमोकळेपणे बोलत असे. डॉक्टर शानभाग म्हणायचे की, The most important component in the stethoscope is what lies between two ear pieces. म्हणजे ऐकणाऱ्याचे कान आणि ते समजावून घेणारा मेंदू. शाळेत असताना एक निबंध हमखास लिहायला असायचा- ‘आग- शाप की वरदान?’. खरेतर कुठच्याही यंत्राच्या बाबतीत किंवा माणसाच्या बाबतीत हेच म्हणता येईल. आपल्यातील अज्ञान समोरच्या माणसातील अपप्रवृत्तींना जागवते. सगळ्याच विषयातील ज्ञान मिळवणे अशक्य असले तरी शिक्षणामुळे अपप्रवृत्ती लवकर ओळखता येण्याची शक्यता वाढते आणि असे दहावाली नळी आणि पंचवीसवाली नळी करणाऱ्या लोकांना भीती वाटू शकते. वैद्याला यमाचा मोठा भाऊ म्हणलेले बऱ्याच जणांना ठाऊक असते. ‘वैद्यो नारायणो हरी’ असेपण म्हणतात, हे मात्र बरेच जण विसरलेले असतात. डॉक्टरला यमजेष्ठसहोदर बनविण्यात किंवा नारायण बनविण्यात त्याच्या पेशंटचा थोडासा सहभाग असतोच.