स्टॅगिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


प्राचीन ग्रीसमधील शहर स्टॅगिरा

स्टॅगिरा किंवा स्टॅगिरस हे प्राचीन ग्रीसमधील शहर असून ते प्राचीन ग्रीक तत्त्ववेत्ता आणि राजकारण धुरंधर ॲरिस्टॉटलचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते. या शहराची स्थापना आयोनियन वसाहतवाद्यांनी इसवी सन पूर्व ६५५ साली केली असावी, असे इंग्रजी विकिपीडियात म्हंटले आहे.

हे शहर विद्यमान स्टॅगिरा या शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे.

मॅसिडोनियन सम्राट फिलीप दुसरा याने हे शहर इसवी सन पूर्व ३८४ मध्ये जिंकले आणि त्याचा नाश केला. तथापि त्याच्या मुलाचा शिक्षक आणि गुरू ॲरिस्टॉटल यास गुरुदक्षिणा म्हणून फिलीपने पुन्हा हे शहर वसविले. जुन्या साऱ्या रहिवाशांवर त्याने गुलामगिरी लादली. त्याने नव्याने काही वस्तू उभारल्या; त्यात दिमित्री या देवतेची दोन मंदिरे आणि काही नाली तसेच वस्त्या यांचा समावेश होता.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]