स्कर्व्ही ग्रास
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
कर्व्ही ग्रास : (इं. स्पूनवर्ट लॅ. कॉक्लिॲरिया ऑफिसिनॅलिस कुल-क्रुसिफेरी). रक्तपित्त (व्याधी) नाशक म्हणून वापर व लागवड करण्यात येणारी ही लहान ओषधीय द्विवर्षायू वनस्पती. इंग्रजी नावाप्रमाणे ती गवत नसून ⇨ क्रुसिफेरी कुलातील एक द्विदलिकित फुलझाड आहे. ती मूळची उत्तर ध्रुवीय असून हल्ली ब्रिटनमध्ये समुद्रकिनारी आढळते आशियातील समशीतोष्ण भागात व यूरोपातही सामान्यपणे आढळते. तिच्या प्रजातीतील (कॉक्लिॲरिया) वनस्पतींची पाने काहीशी चमच्यासारखी असल्याने त्यावरून ग्रीक भाषेत चमचा या अर्थी वापरलेल्या कॉक्लिअर शब्दाचा उपयोग प्रजाती नाम बनविण्यात केला आहे. एक इंग्रजी नावही त्याच अर्थाचे आहे. कॉक्लिॲरिया प्रजातीत सु. २५ जाती असून त्यांचा प्रसार उ. समशीतोष्ण प्रदेश, दक्षिण ते पूर्व हिमालय आणि जावातील डोंगराळ भाग येथे आहे. सुमारे १५ जाती यूरोपात व उ. अमेरिकेत आढळतात. नॅस्टर्शियम, रोरिपा व रॅडिक्युला या भिन्न प्रजातींत कॉक्लिॲरियातील काही जाती हल्ली समाविष्ट करतात. सर्वच जाती मांसल पानांच्या असून बहुतेक सर्व समुद्रकिनारी आढळतात. कॉ. आर्मोरॅशिया (रोरिपा आर्मोरॅशिया आर्मोरॅशिया लॅपॅथिफोलिया) ही यूरोपीय जाती उ. भारतात व द. भारतातील गिरिस्थानकांत लावलेली आढळते. तिच्या मुळांचा उपयोग अन्नपदार्थास स्वाद आणण्यास करतात. तिला इंग्रजीत ‘हॉर्स रॅडिश’ म्हणतात.
स्कर्व्ही ग्रासची लागवड वर्षायूसारखी करतात. ती ५-३० सेंमी. उंच वाढते. मूलज पानांना देठ असतो व ती हृदयाकृती असतात स्कंधोद्भव पाने अल्पवृंत, आयत व दातेरी असतात. फुले पांढरी व लहान असून गोलसर शुष्क फळे (सार्षपक) येतात तिचे एकंदर स्वरूप लुतपुतियासारखे [नॅस्टर्शियम ऑफिसिनेल ⟶ नॅस्टर्शियम] असते. सामान्य शारीरिक लक्षणे क्रुसिफेरी कुलात वर्णिल्याप्रमाणे असतात. ती उत्तेजक, मूत्रल, दीपक, रेचक, तिखट, कडू व दाहक असून चुरगळली असता डांबरासारखा दुर्गंध येतो. ती स्कर्व्हीनाशक आहे. तिचा उपयोग सॅलड म्हणून क्वचित करतात. नवीन लागवड बियांपासून सावलीत करतात. बी पिंगट लालसर, लहान व लंबगोल असून काहीसे खरबरीत व कोनीय असते.