सोलंग एतोर
सोलंग एतोर हा भारत देशाच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील आदी जनजातीचा उत्सव आहे.[१] शेतीचा नवा हंगाम सुरू करण्यापूर्वी जनजाती सदस्य हा उत्सव साजरा करतात.[२]
स्वरूप
[संपादन]हा उत्सव एकूण पाच दिवस सुरू असतो. या दिवशी उत्सवाची पूर्वतयारी केली जाते. दुसऱ्या दिवशी पशुबळी दिला जातो.[३] या उत्सवात सदस्य समूहाने मिळून तिसऱ्या दिवशी पाळीव प्राण्यांच्या आरोग्यासाठी देवतांना प्रार्थना करतात तसेच आपल्या वस्तीमध्ये खेड्यामध्ये समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करतात.[४] चौथा दिवस पुरुष सदस्य धनुष्य बाण आणि भाले तयार करण्यासाठी वेळ देतात. शेवटच्या दिवशी देवतांना शाही नैवेद्य अर्पण केले जातात. या विशिष्ट प्रसंगी उत्सवी नृत्य केले जाते.[५]
लोकगीते
[संपादन]या उत्सवात गायली जाणारी लोकगीते हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. दररोज संध्याकाळी मानवाची उत्पत्ती,पारणी, वनस्पती तसेच आदी जनजातीचे पूर्वज त्यांचे पराक्रमी वीर यांच्या विषयी माहिती या गाण्यांत असते.
चित्रदालन
[संपादन]-
युद्ध नृत्य
संदर्भ
[संपादन]- ^ "Culture & Heritage | District East Siang, Government of Arunachal Pradesh | India" (इंग्रजी भाषेत). 2022-06-10 रोजी पाहिले.
- ^ "Solung Etor celebrated with gaiety". Arunachal Observer (इंग्रजी भाषेत). 2019-05-15. 2022-06-10 रोजी पाहिले.
- ^ Lepcha, Irani Sonowal (2020-09-01). "Arunachal Pradesh: Harvest festival of Adi tribe, Solung, begins". EastMojo (इंग्रजी भाषेत). 2022-06-15 रोजी पाहिले.
- ^ Sachchidananda; Prasad, R. R. (1996). Encyclopaedic Profile of Indian Tribes (इंग्रजी भाषेत). Discovery Publishing House. ISBN 978-81-7141-298-3.
- ^ Tayeng, Obang (2003). Folk Tales of the Adis (इंग्रजी भाषेत). Mittal Publications. ISBN 978-81-7099-899-0.