सोल विश्वचषक स्टेडियम
Appearance
(सेउल विश्वचषक मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
सोल विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 서울월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाची राजधानी सोल शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ६६,८०६ आसनक्षमता असलेले व २००१ साली खुले करण्यात आलेले हे दक्षिण कोरियामधील सर्वात मोठे स्टेडियम आहे. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते. सध्याच्या घडीला दक्षिण कोरिया फुटबॉल संघ आपले सामने येथून खेळतो.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-07-21 at the Wayback Machine. (कोरियन)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत