सूत्रपाठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठीतील पहिला शास्त्रीय धर्मग्रंथ[संपादन]

सूत्रपाठ हा महानुभावांचा ‘वचनरूप परमेश्वर’ आहे. केशिराज व्यासांनी नागदेवाचार्यांना ‘शास्त्रप्रकरणान्वय’ लाऊ का? अशी अनुज्ञा घेऊन सूत्रपाठ सिद्ध केला. लीळाचरित्रातूनच श्रीचक्रधरोक्त वचने जी विखुरलेली होती, ती एकत्र केली. ही सगळी वचने काहीतरी तत्त्वज्ञान मांडू पाहणारी होती. काहीतरी आचारपद्धती सांगू पाहणारी होती. त्यांचे लक्षण, विचार आणि आचार असे वर्गीकरण केले. त्यांचा एकमेकांशी सुसंगत ‘अन्वय’ लावला. शके १२१२- १३ मध्ये हा ग्रंथ पूर्ण झाला.