Jump to content

सूक्ष्मराष्ट्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीलँड यूनायटेड किंग्डम मधील एक सूक्ष्मराष्ट्र आहे.

सूक्ष्मराष्ट्र (इंग्रजी: Micronation) त्या राष्ट्रांना म्हणले जाते ज्यांना विशेष आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली नसते.[] म्हणूनच, ते तैवान सारख्या प्राधिकरण आणि मान्यताप्राप्त सरकार-निर्वासन पेक्षा वेगळे आहे. जास्त तर सूक्ष्मराष्ट्र फारच लहान असतात परंतु काही सूक्ष्मराष्ट्र तर काही देशांपेक्षाही मोठे असतात. 'मायक्रोनेशन' हा शब्द सर्वात पहिले 1970s मध्ये वापरल्या गेलेला.[]

इतिहास

[संपादन]

प्रारंभिक इतिहास आणी विकास

[संपादन]

सूक्ष्मराष्ट्र 19व्या शतकाच्या सुरुवातीला दिसू लागली. सर्वात पहिल्या सूक्ष्मराष्ट्रांपैकी एक म्हणजे कोकोस बेट, ज्यावर क्लूनिस-रॉस कुटुंबाचे राज्य होते. रेडोंडा हा सर्वात जुना सूक्ष्मराष्ट्र आहे जो आतापर्यंत टिकून आहे. त्याची स्थापना 1865 मध्ये कॅरिबियनमध्ये झाली होती. त्याचा स्वतःचा राजा आहे. सध्या रेडोंडाच्या सिंहासनासाठी किमान चार दावेदार आहेत. []

1960 ते 1980चा इतिहास

[संपादन]

या काळात अनेक चांगल्या सूक्ष्मराष्ट्रांची स्थापना झाली. सीलँड हे यापैकी पहिले होते. तो आतापर्यंत टिकून आहे आणि तो एक महान लाहुराष्ट्र म्हणूनही ओळखला जातो. रोझ आयलँड (एस्पेरांतो: Respubliko de la Insulo de la Rozoj; इटालियन: Repubblica dell'Isola delle Rose) हे अॅड्रियाटिक समुद्रातील एक सूक्ष्मराष्ट्र होते जे इटलीच्या रिमिनी प्रांताच्या 11 किलोमीटर दूर एका प्लॅटफॉर्मवर स्थित होते. हे इटालियन इंजीनियर जॉर्जियो रोझा यांनी बांधले होते, ज्यांनी स्वतःला त्याचे राष्ट्राध्यक्ष बनवले आणि 1 मे 1968 रोजी एटलीपासून स्वतंत्र घोषित केले. [][]

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडचे योगदान

[संपादन]

पृथ्वीवरचे सर्वात जास्त लाहुराष्ट्र ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंडमधील आहेत. तिथे सूक्ष्मराष्ट्र खूप सामान्य आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Sawe, Benjamin. "What Is a Micronation?". World Atlas: World Facts. World Atlas. 6 December 2017 रोजी पाहिले.
  2. ^ The People's Almanac #2, page 330.
  3. ^ "John D. Squires, "Of Dreams and Shadows: An Outline of the Redonda Legend with Some Notes on Various Claimants to its Uncertain Throne."". 2012-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-08-06 रोजी पाहिले.
  4. ^ Marco Imarisio. "Riemerge l'isola dell'Utopia". Corriere della Sera (Italian भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "Piattaforma davanti a Rimini proclamata "Stato indipendente"". La Stampa (Italian भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)