सुरण
सुरण (वनस्पतीशास्त्रीय नाव: Amorphophallus paeoniifolius; इंग्लिश: Elephant foot yam) ही दक्षिणपूर्व आशिया खंडातील उष्णकटिबंधीय कंदमूळ प्रकारातील वनस्पती आहे. दक्षिणपूर्व आशिया, दक्षिण आशिया, मादागास्कर, न्यू गिनी आणि पॅसिफिक बेटांवर कंदांसाठी या वनस्पतीची लागवड केली जाते. कमी खर्चात वाढणारे हे एक नगदी पीक म्हणून वाढविले जाऊ शकते. या वनस्पतीच्या सर्व भागांचा खाण्यात अन्न तसेच औषध म्हणून वापर होतो. कंद उकडून - कुस्करून किंवा तळून खाल्ला जातो किंवा यांची रस्सा भाजी देखील करतात. भारतात काही ठिकाणी लोणच्यामध्ये किंवा चिप्स बनवण्यासाठी देखील कंद वापरले जातात. याची हिरवी पाने आणि देठ देखील पालेभाज्या म्हणून शिजवल्या जातात.[१][२]
सुरण कांदाचा भारतीय औषधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी या तीनही प्रमुख भारतीय औषधी पद्धतींमध्ये औषधी कंद म्हणून याची शिफारस केली जाते. विशेष करून मूळव्याधीवर हा कंद उपयुक्त असल्याचे मानले जाते.[३] [४]
पोषण तत्व | मात्रा |
---|---|
पाणी | ६९.६ |
ऊर्जा | ११८ किलो कॅलरी |
प्रोटीन | १.५३ ग्रॅम |
लिपिड (चरबी) | ०.१७ ग्रॅम |
कार्बोहायड्रेट | २७.९ ग्रॅम |
राख | ०.८८२ ग्रॅम |
रेषे | ४.१ ग्रॅम |
शर्करा | ०.५ ग्रॅम |
कॅल्शियम | १७ मिलीग्राम |
लोह | ०.५४ मिलीग्राम |
मॅग्नेशियम | २१ मिलीग्राम |
फॉस्फरस | ५५ मिलीग्राम |
पोटॅशियम | ८१६ मिलीग्राम |
संदर्भ
[संपादन]- ^ "Ol Bhaate | Mashed Elephant Foot Yam | Sooran ka Chokha from seasonalflavours.net". www.fooderific.com. 2020-07-31 रोजी पाहिले.
- ^ Nedunchezhiyan, M.; Misra, R. S. (2008). "Amorphophallus tubers invaded by Cynodon dactylon". Aroideana. International Aroid Society. 31 (1): 129–133.
- ^ Khare, C. P. (2007). Indian Medicinal Plants: An Illustrated Dictionary. Berlin: Springer Verlag. ISBN 978-0-387-70637-5.
- ^ Curative effect of Amorphophallus paeoniifolius tuber on experimental hemorrhoids in rats. Dey YN, et al. J Ethnopharmacol. 2016.
- ^ "जिमीकंद (Elephant Yam in Hindi): उपयोग, लाभ, और न्यूट्रिशनल वैल्यू". pharmeasy.in. २९ एप्रिल २०२४ रोजी पाहिले.