सुबोध घोष
Appearance
Bengali writer, journalist (1909–1980) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | সুবোধ ঘোষ | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | सप्टेंबर १४, इ.स. १९०९ हजारीबाग | ||
मृत्यू तारीख | मार्च ९, इ.स. १९८० कोलकाता | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
मातृभाषा | |||
पुरस्कार |
| ||
| |||
सुबोध घोष (१४ सप्टेंबर १९०९ - १० मार्च १९८०) [१] हे बंगाली साहित्यातील प्रख्यात भारतीय लेखक आणि कोलकाता येथील आनंद बाजार पत्रिका या दैनिकाचे पत्रकार होते. हजारीबाग येथे त्यांचा जन्म झाला.
त्यांच्या अनेक कथा भारतीय चित्रपटांसाठी रूपांतरित केल्या गेल्या आहेत, विशेष म्हणजे ऋत्विक घटकचा अजंत्रिक (१९५८) आणि बिमल रॉयचा सुजाता (१९५९). [२] बिमल रॉय यांच्या सुजाता (१९५९) आणि १९८९ मध्ये गुलजारच्या इजाजतसाठी त्यांना दोनदा सर्वोत्कृष्ट कथेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारासाठी १९७७ मध्ये त्यांची निवड झाली होती पण त्यांनी ती नाकारली. [३]
संदर्भ
[संपादन]- ^ Sisir Kumar Das (1 January 1995). History of Indian Literature: 1911–1956, struggle for freedom : triumph and tragedy. Sahitya Akademi. pp. 276–. ISBN 978-81-7201-798-9. 12 July 2012 रोजी पाहिले.
- ^ Gulzar; Govind Nihalani; Saibal Chatterjee (2003). Encyclopaedia of Hindi cinema. Encyclopedia Britannica. p. 337. ISBN 81-7991-066-0.
- ^ Dr. Sibsankar Pal. Subodh Ghosh-er Chhotogalpe Manobik Mulyobodh.