सुनीलतारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सुनीलतारा म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या वाङ्‌मयामध्ये वर्णन केलेला नीलबिंदू. हा नीलबिंदू म्हणजे योगमार्गावरील देदीप्यमान असा ध्रुवताराच गणला गेला आहे. त्याला योगी ज्ञानदेवांनी सुनीलतारा म्हटले आहे. या तार्‍याचे महत्त्व ज्ञानदेवांनी ३३ ओव्यांमधून सांगितले आहे. या ज्ञानदेव तेहतिशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओव्यांचा अर्थ सांगणारे व त्यावर भाष्य करणारे सुनीलतारा नावाचे पुस्तक डॉ. मानसी कणेकर यांनी लिहिले आहे. या पुस्तकात अतींद्रिय अनुभवांच्या स्वर्गलोकातील दिव्य, गूढ प्रवासाचे चित्रण आहे.