Jump to content

सुनील शेट्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुनिल शेट्टी या पानावरून पुनर्निर्देशित)
सुनील शेट्टी
सुनील शेट्टी
जन्म सुनील शेट्टी
११ ऑगस्ट १९६१
कर्नाटक, भारत
इतर नावे अन्ना
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
भाषा हिंदी
प्रमुख चित्रपट भाई, हेरा फेरी, धडकन
पुरस्कार फिल्मफेअर (सर्वोत्कृष्ट खलनायक) (२००१)
अपत्ये अथिया शेट्टी

सुनील शेट्टी (जन्म - ११ ऑगस्ट १९६१ - हयात) हा हिंदी चित्रपटातील अभिनेता, निर्माता तसेच हॉटेल व्यावसायिक आहे. त्याने अनेक विनोदी तसेच एक्शन चित्रपटात भूमिका केल्या आहेत. दिलवाले, सपूत, हेर फेरी, मोहरा हे त्याचे प्रमुख चित्रपट आहेत. धडकन या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी सुनीलला २००१ या वर्षीचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला होता. हेरा फेरी चित्रपटातील 'श्याम' तसेच आवारा पागल दिवाना चित्रपटातील 'येडा अन्ना' या त्याच्या भूमिका लोकांनी विशेष पसंत केल्या. अक्षय कुमार सोबत त्याने अनेक चित्रपट केले व बहुदा सर्वच चित्रपट यशस्वी ठरले. अक्षय कुमार व सुनील शेट्टी या जोडीला भरपूर लोकप्रियता मिळाली.

चित्रपट अभिनय खेरीज सुनील शेट्टी स्वतःचे उडपी खानावळ (रेस्तोरांत) व रेडीमेड कपड्यांचे दालन देखील चालवितो.