सुधा नरवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुधा मुकुंद नरवणे (माहेरच्या पारसनीस) (१४ सप्टेंबर, १९३० - २३ जुलै, २०१८:पुणे) या एक मराठी लेखिका होत्या. त्यांच्या लघुकथा व लघुनिबंध किर्लोस्कर, माणूस, सत्यकथा, स्त्री, हंस, इ. अनेक नियतकालिकांत प्रसिद्ध झाल्या.

पुस्तके[संपादन]

  • आपल्या आत्म्यांची लुटालूट (अनुवादित, मूळ Harvesting Our Souls, लेखक - अरुण शौरी)
  • इतवा मुंडाने लढाई जिंकली (आदिवासी जीवनावरील कादंबरी)
  • इंद्रधनू (कथासंग्रह)
  • ख्यातनाम इतिहासकार (अनुवादित, मूळ Eminent Historians, लेखक - अरुण शौरी)
  • घायाळ
  • जननी : माता, कन्या, मातृत्व
  • ते अठरा सेकंद
  • दॊलाचल (कथासंग्रह)
  • निकोलला त्याच्या आईचे मारेकरी सापडले का (अनुवादित, मूळ Eleni, लेखक : निकोलस गेग).
  • मरालिका (कथासंग्रह)
  • लामणदिवा