सुडोकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अवघड सुडोकू कोडे

सुडोकू हा एक कोडेवजा खेळ आहे जो शब्दकोडे, जादूचा चौरस किंवा बुद्धिबळाच्या कोड्यांप्रमाणे वर्तमानपत्रात छापला जातो. यात एका चौरसाचे ९x९ छोट्या चौरसांमध्ये विभाजन करतात. या खेळाचा उद्देश हा आहे की प्रत्येक ओळीत आणि स्तंभात १ ते ९ पर्यंतचे अंक अशा पद्धतीने भरायचे की कोणताही अंक एका ओळीत किंवा स्तंभात किंवा ३x३ च्या छोट्या चौरसात फक्त एकदाच येईल.

जपानी भाषेत भाषेत सुडोकूचा अर्थ आहे "एकटा अंक".

हा खेळ प्रसिद्ध होण्याचे कारण हे आहे की या खेळाचे नियम सोपे आहेत तरीही तो पूर्ण करणे अवघड असते. साधारणपणे ९x९ च्या चौरसातील काही अंक आधीच दिलेले असतात. खेळणाऱ्याला वरील नियम पाळून रिकाम्या चौरसांमध्ये अंक भरायचे असतात.

सर्वात प्रथम सुडोकू १९७० मध्ये न्युयॉर्कमध्ये प्रकाशित झाले होते. हे कोडे इ.स. १९८४ मध्ये जपानमध्ये वर्तमानपत्रात पहिल्यांदा आले. इ.स. २००५ मध्ये सुडोकुला आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकप्रियता लाभली. भारतात बऱ्याच वर्तमानपत्रात याचे प्रकाशन चालू झाले आहे.