सुखुमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सुखुमी किंवा सोखुमी हे जॉर्जिया देशाच्या अबखाझिया या फुटीर प्रांताची राजधानी आहे.

या शहराचा उल्लेख इ.स.पू. ६व्या शतकातील ग्रीक इतिहासात सापडतो. त्यावेळ याचे नाव डियोस्कुरियास होते. १९९२-९३मध्ये झालेल्या जॉर्जिया अबखाझिया युद्धादरम्यान या शहराचे मोठे नुकसान झाले. १९९० च्या दशकाअखेर सव्वा लाख्याच्या वर वस्ती असलेल्या या शहरात २०११ च्या जनगणनेनुसार ६२,९१४ व्यक्ति राहत होत्या.