सियेरा काउंटी (कॅलिफोर्निया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्टॅम्पीड धरण

सियेरा काउंटी (कॅलिफोर्निया) ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डाउनीव्हिल येथे आहे.[१]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,२३६ इतकी होती.[२] ही काउंटी कॅलिफोर्नियातील दुसऱ्या क्रमांकाची कमीतकमी वस्ती असलेली काउंटी आहे.[३]

सियेरा काउंटीची रचना १८५२मध्ये झाली.

येथे जमिनीवर तसेच लगत मोठ्या प्रमाणात सोने सापडले होते. डाउनीव्हिल जवळ १२ किलो सोन्याचा गट्टू डाउनीव्हिलजवळ सापडला होता. तसेच १८५३मध्ये काही फ्रेंच भटक्यांना २३ किलो वजनाचा सोन्याचा गट्टू सापडला. सप्टेंबर१८६९मध्ये सियेरा सिटीजवळ ४९ किलो वजनाचा सो्याचा गट्टू सापडला होता,[४]


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Sierra County, California". United States Census Bureau. January 30, 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "2020 Population and Housing State Data". August 15, 2021 रोजी पाहिले.
  4. ^ Gilbert, Frank; Wells, Harry (1882). Illustrated History of Plumas, Lassen & Sierra Counties, with California from 1513 to 1850. San Francisco: Fariss & Smith. pp. 478–483.