सिडनी ऑपेरा हाऊस

सिडनी ऑपेरा हाउस (इंग्लिश: Sydney Opera House) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या सिडनी शहरामधील एक बंदिस्त नाट्यगृह आहे. योर्न उट्झन ह्या डॅनिश स्थापत्यकाराने कल्पलेले व बांधलेले हे नाट्यगृह इ.स. १९७३ साली खुले करण्यात आले. सिडनी ऑपेरा हाउसमध्ये नृत्य, नाटके, ऑपेरा, संगीत अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम होतात. वर्षामध्ये सरासरी १,५०० कार्यक्रम भरवणारे हे ऑपेरा हाउस जगातील सर्वात वर्दळीच्या नाट्यगृहांपैकी एक आहे.
सिडनीच्या पोर्ट जॅक्सन ह्या प्रशांत महासागरावरील नैसर्गिक बंदराजवळ स्थित असलेले ऑपेरा हाउस हे सिडनीमधील सर्वात मोठे पर्यटक आकर्षण असून जवळील सिडनी हार्बर ब्रिजसोबत ते सिडनी व ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या खुणांपैकी एक मानले जाते. ह्या वास्तूसाठी उट्झनला २००३ साली प्रिट्झ्कर स्थापत्य पारितोषिक हा स्थापत्यशास्त्रामधील सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला.
युनेस्कोने २००७ साली सिडनी ऑपेरा हाउसला जागतिक वारसा स्थान बनवले.

बाह्य दुवे[संपादन]
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |