सिउदाद बॉलिव्हार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सिउदाद बॉलिव्हार हे वेनेझुएलाच्या बॉलिव्हिया राज्यातील शहर आहे. ओरिनोको नदीकाठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या अंदाजे ३,५०,००० आहे.

या शहरात ओरनोको नदीच्या उगमाकडील पहिला पूल आहे तसेच नदीवर मोठा धक्काही आहे. हे शहर वेनेझुएलाच्या पूर्व भागातील मोठे व्यापारकेंद्र आहे.

या शहराची स्थापना १७६४ साली सांतो तोमे दि गयाना दि आंगोस्तुरा देल ओरिनोको या नावाने झाली. त्यानंतर या शहराला आंगोस्तुरा नाव मिळाले. १८४६ साली शहराला सिमोन बोलिव्हारचे नाव देण्यात आले.