सावरगाव पाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अकोले तालुक्यातील सावरगाव पाट हे डोंगरात वसलेलं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या क्रांतिकारी स्वातंत्रसैनिकांचं गाव आहे. ह्या भागाला डांगण भाग म्हणून ओळखले जात. आढळा नदीच्या तीरावर वसलेलं सावरगाव म्हणजे पूर्वीची साबरवाडी. काटेरी साबराची झाडे त्यावेळी फार होती, म्हणून साबरवाडी. पण नंतर अपभ्रंश होत सावरगाव असे नाव पडले. पूर्वी काही वस्त्या नदीच्या अल्याड व पल्याड अशा वसलेल्या होत्या. अहिल्याबाई होळकर यांच्या काळात पिण्याच्या पाण्याचा दगडी पाट त्या काळातील बांधकाम पद्धतीमध्ये बांधून देण्यात आला होता. नदीच्या ज्या बाजूने पाट बांधण्यात आला त्या बाजूने पल्याड राहत असलेल्या सर्व वस्त्या स्थलांतरित झाल्या. त्या पाटावरून पाटाचं सावरगाव असे लोक म्हणू लागले. नंतर सावरगाव पाट असे अधिकृत नाव या गावाला मिळाले. तो पाट अजूनही अस्तित्वात आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पट्टा किल्यावर विश्रांतीसाठी थांबत त्यावेळी ते सावरगावच्या जवळ असलेल्या टाहाकारी येथील देवीच्या मंदिरात काही सरदारांसह दर्शनाला येत, त्यावेळी ते जवळच्या गावांना भेटी देत. त्यांच्या पदस्पर्शाने सावरगाव पाट हेही पावन झाले आहे. सावरगाव पाट हे गाव व नाव गाजले ते भारतीय स्वातंत्र्य संग्रामात. येथे भुमीगतांच्या, मोठमोठ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या गुप्त बैठका होत असत. या गावात प्रवेश करण्याचे धाडस इंग्रज अधिकारी करत नसत. इतकी जरब त्या काळी येथील स्वातंत्र सैनिकांची होती. यात स्वातंत्र्यसेनानी किसन पाटील नेहे, रामभाऊ पाटील नेहे या बंधूचे योगदान मोठे होते. स्वातंत्र्यासाठी त्यांनी तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात, अण्णासाहेब शिंदे, धर्मा पोखरकर, रावसाहेब शिंदे आदी मंडळीचा योजना, बैठकीचा, खलबते करण्यासाठी सुरक्षित गाव म्हणजे सावरगाव पाट.( क्रमश..)-प्रसाद नेहे