साल्व्हादोर दाली
साल्व्हादोर दाली Salvador Dalí | |
---|---|
जन्म |
मे ११, इ.स. १९०४ फिगेरेस, कातालोनिया, स्पेन |
मृत्यू |
जानेवारी २३, इ.स. १९८९ फिगेरेस, स्पेन |
राष्ट्रीयत्व | स्पॅनिश |
पेशा | चित्रकार |
साल्व्हादोर दाली (स्पॅनिश: Salvador Domènec Felip Jacint Dalí i Domènech, Marquis de Púbol; मे ११, इ.स. १९०४ - जानेवारी २३, इ.स. १९८९) हा एक स्पॅनिश चित्रकार होता.
चित्रकृती
[संपादन]साल्वादोर दालीने जवळपास १५०० चित्रकृतींची निर्मिती केली.[१] इ.स. १९२७ साली साल्वादोरने `हनी इज स्वीटर दॅन ब्लड' हे आपले पहिले अस्तित्ववादी चित्र रेखाटले. `इल्यूमिड प्लेझर्स' या त्याच्या चित्रकृतीत त्याने परस्परविसंगत जटिल प्रतिमांच्या गर्दीत स्त्रीवर अतिप्रसंग करणाऱ्या पुरुषाची प्रतिमा रेखाटली आहे. `सिटी ऑफ ड्रॉअर्स' मध्ये स्त्रीच्या नग्न शरीरातून टेबलाचे खण बाहेर पडताना दाखवले आहेत. `द स्पेक्टर ऑफ सेक्स अपील' या चित्रकृतीकून त्याने बालकांच्या मनातील सुप्त कामप्रेरणांचा प्रतिकात्मक वेध घेतला. `वन सेकंद बिफोर अवेकनिंग फ्रॉम अ ड्रीम कॉज्ड बाय द फ्लाईट अराऊंड अ पॉमग्रेनेट' (इ.स. १९४४) या चित्रातून त्याने डाळिंबातून झेपावणारी क्रूर श्वापदे स्त्रीवर आक्रमण करताना रेखाटली आहेत.[२] स्पेनमधील यादवी युद्धावर `प्रीमोनिशन ऑफ सिव्हिल वार' हे यादवीचे संहारक परिणाम सूचित करणारे चित्र साल्वादोरने इ.स. १९३६ साली काढले. फ्रॉइडच्या `नार्सिसिझम'वर आधारलेले `मेटॅमॉर्फोसिस ऑफ नार्सिसस' हे चित्रही त्याने रेखाटले. अवकाशाची असीमता आणि काळाची अनेकार्थी रुपे सूचित करणारे `द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' हे चित्र त्याने इ.स. १९३१ साली रेखाटले. सध्या ते न्यू यॉर्क येथील `म्युझियम ऑफ माॅडर्न आर्ट' येथे ठेवलेले आहे.[३] `द पर्सिस्टन्स ऑफ मेमरी' आणि `ॲग्नॉस्टिक सिंबल' या दोन्ही चित्रात त्याने घड्याळाच्या प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर केलेला आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "The Salvador Dalí Online Exhibit". MicroVision (इंग्रजी भाषेत). २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य) - ^ "Dream Caused by the Flight of a Bee Around a Pomegranate, A Second Before Awakening" (इंग्रजी भाषेत). Fulcrum Gallery. २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य) - ^ "Salvador Dalí. The Persistence of Memory. 1931" (इंग्रजी भाषेत). म्युझियम ऑफ माॅडर्न आर्ट, न्यू यॉर्क. २४ सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter
|अनुवादीत title=
ignored (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- "साल्व्हादोर दाली - म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)