सामान्य क्रौंच
सामान्य क्रौंच किंवा कुलंग (इंग्लिश:Eastern Common Crane; हिंदी:कुरुंच, कुंज, कूर्च; संस्कृत:क्रौञ्च, पुष्कर, प्राच्य क्रौञ्च, लक्ष्मण; गुजराती:करकरो, कुंज; तेलुगू:कूलम, कूलंग, कोलंग कोंग) हा एक पाणपक्षी आहे.
हा पक्षी दिसायला सारसासारखा असतो परंतु आकाराने लहान, डोळे, गळा आणि मानेवरचा रंग काळा असतो. याच्या डोळ्यांपासून गळ्याखाली जाणारी रुंद पट्टी पांढरी असते, तर मानेमागचा रंग पांढरा असतो. कपाळाच्या खालच्या भागावर तांबडा डाग असतो. सर्व पंख आणि शेपटींच्या पिसांचा रंग काळा असून पाय काळे असतात. उदी रंगाच्या केसांसारख्या बारीक पिसांनी शेपटी झाकलेली असते. नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.
वितरण
[संपादन]ते पाकिस्तान आणि उत्तर भारत तसेच बंगाल, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश भागात हे हिवाळी पाहुणे असतात. पॅलिआर्क्टिक भागात मे-जून या काळात यांची वीण होते.
निवासस्थाने
[संपादन]हे पक्षी सरोवरे, नद्या, शेतीचा प्रदेश आणि भातशेती अश्या ठिकाणी आढळतात.
चित्रदालन
[संपादन]-
सामान्य क्रौंचचे नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यातील चित्र
-
सामान्य क्रौंच
संदर्भ
[संपादन]- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली.