Jump to content

सान्तोरिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सान्तोरिनी बेटाचे उपग्रहीय चित्र

सान्तोरीनी ग्रीस देशाच्या अख्त्यारीखालील एजियन समुद्रातील बेट आहे. असे मानतात की ग्रीस मधील द्विपसमूहातील सर्वात सुंदर बेट आहे. हे बेट घोड्याच्या नाल्याच्या आकारात असून ज्वालामुखीने तयार झाले आहे. बेटामध्ये अजूनही काही ठिकाणी गरम पाण्याचे फवारे येतात. ग्रीक दंतकथांप्रमाणे पुराणकालीन अटलांटिस शहर हे याच बेटाच्या परिसरात वसले होते. काही हजार वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकात बेटाचा मध्यभाग पाण्याखाली गेला व आजचे दिसणारे सान्तोरिनी बेट राहिले. ग्रीसला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या यादीत सान्तोरिनी हे बेट बहुतांशी समाविष्ट असते.

या बेटाचे वैशिठ्य म्हणजे या बेटाला फारसा वाळूचा किनारा नाही आहे व पाण्यातून सरळ २०० मीटर उंच असा डोंगर कडा आहे. या डोंगरावर ज्वालामुखीचे विविध स्तर दिसतात व या विविध स्तरांमध्ये विविध जातींचे दगड पहावयास मिळतात. त्यामुळे भूगर्भ शास्त्रज्ञांच्या दृष्टीने या बेटाला निराळे महत्त्व आहे. डोंगर माथ्यावर बेटावरील गावे वसलेली असून थीरा, ऑया अशी काही गावे आहेत.