सादतखान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सादतखान हा अयोध्येच्या वारसाराज्याची स्थापना करणारा मुघल सरदार होता. महंमद अमिन असे त्याचे नाव असून सादतखान हा त्याचा किताब होता. तो मूळचा पर्शियाचा होता. त्याने इ.स. १७२२ पासून इ.स. १७३९ पर्यंत अयोध्येचा नवाब म्हणून कारभार केला.