साईनाथ पारधी
Appearance
साईनाथ पारधी हा वाडा तालुक्यातील गोऱ्हे गावचा एका आदिवासी शेतमजूराचा मुलगा आहे.साईनाथची आई शेतमजुरी करते.त्याचे वडील अपंग आहेत.जॉर्डन देशातील अम्मान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको रोमन प्रकारातील ५१ किलो वजन गटाच्या १७ वर्षाखालील गटात कास्य पदक मिळविले. साईनाथचे वय पंधरा वर्षे आहे.त्याने कझाकस्तानच्या येरासी मुसान याचा कुस्ती स्पर्धेत ३-१ असा पराभव केला.साईनाथचे वडीलसुद्धा कुस्ती खेळत असत.एका अपघातात त्यांना अपंगत्व आले आणि कुस्ती सोडायला भाग पडले. सुरुवातीला साईनाथने मीरा भाईंदर अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या वाड्यातील सदानंद पाटील ह्या कबड्डीपटू आणि कुस्तीगीराच्या मार्गदर्शनाखाली भाईंदर येथील गणेश आखाडा कुस्ती केंद्रात प्रशिक्षण घेतले.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०२४