सांख्य कारिकेनुसार तीन गुणांचे विवेचन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सांख्य दर्शन हे भारतीय दर्शानान्मधिल एक प्राचीन दर्शन आहे. या सांख्य दर्शनाचे आद्य प्रवर्तक कपिल महामुनि मानले जातात. या कपिल महामुनिंच्या नावाचा उल्लेख बरेच ग्रंथात सापडतो. श्रीमद्भागवत मधेही कपिलांनी आपला शिष्य आसुरी याला सांख्य शास्त्राचा उपदेश केला असा स्पष्ट उल्लेख आहे. पण खुद्द कपिल महामुनि यांचा एकही ग्रन्थ आता उपलब्ध नहीं. परंपरा असे सांगते की कपिलांनी हे शास्त्र आसुरीला शिकवले आणि आसुरीने त्याचा शिष्य पंचशिख यास हे ज्ञान दिले. पंचाशिखाने आपल्या षष्टितंत्र या ग्रंथात सांख्यशास्त्राचा विस्तार केला. हा ग्रन्थ साध्य अनुपलब्ध आहे. इ. स. १५० च्या सुमारास ईश्वरकृष्ण यांनी षष्टितंत्र या ग्रंथाचे संपूर्ण सार आपल्या ‘ सांख्यकारिका ’ या ग्रंथात फक्त ७० करिकांत समजावून सांगितले आहे. सांख्य दर्शनानुसार तीन गुणांचे विवेचन सांख्य करिकेतिल १२ व्या करिकेत दिले आहे. व्यक्त प्रकृति ही त्रिगुणात्मिका (तीन गुणांनी युक्ता असलेली) आहे असा उल्लेख केला आहे. या करिकेत (सत्त्व, रजस आणि तमस या) तीनही गुणांचे स्वरूप सांगितले आहे. तसेच १३ व्या कारिकेत गुणांची इतर वैशिष्ट्ये आणि त्यांचे परस्पर (सम्बन्ध) कार्य सांगितलेली आहेत.

प्रीत्यप्रीतिविषादात्माकाः प्रकाशप्रवृत्तिनियमर्थाः।

अन्योन्याभिभवाश्रयजननमिथुनवृत्तयश्च गुणाः।।

अर्थ – सुख दुःख आणि मोह हे अनुक्रमे तीन गुणांची स्वरूपं आहेत. प्रकाशित करणे, (कार्यासाठी) प्रवृत्त करणे आणि या दिहोंचे नियमन करणे ही तीन गुणांची (अनुक्रमे) कार्य आहेत. हे गुण एकमेकांचे पराभव करून, एकमेकांचा आश्रय घेउन, एकमेकांची उत्पत्ति करून तसेच एकमेकांची सोबत करून आपापली कार्य करत असतात. या कारिकेतिल पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात गुणांचे स्वरूप (क्रमशः) सांगीतले आहेत. प्रीति म्हणजे सुख, अप्रीति म्हणजे दुःख, आणि विषाद म्हणजे मोह. सुख दुःख आणि मोह ही सत्त्व, रजस आणि तमस या तीन गुणांची क्रमश: लक्षणे आहेत. स्वरूपही आहेत. याच पंक्तिच्या उत्तरार्धात या तीनही गुमंची कार्य देखिल (क्रमशः) सांगितली आहेत. प्रकाश, प्रवृत्ति आणि नियमन ही या तीन गुणांची कार्य आहेत. प्रकाशित करणे हे सत्त्व गुणाचे कार्य आहे. रजोगुण हा गति देणारा आहे. प्रवर्तक आहे म्हणुनच त्याचे कार्य प्रवृत्ति असे सांगितले आहे. आणि या दोहोंवर (सत्त्व आणि रजस गुण) नियंत्रण ठेवणे, दोघांपैकी कोन्य एकाचे प्रभाव जास्त होऊ नये म्हणून त्यांचे नियमन करणे हे तमोगुणाचे कार्य आहे. कारिकेच्या अंतीम चरणात गुणांचा स्वाभाव संगीताला आहे. १. अन्योन्य-अभिभव - अन्योन्य म्हणजे उर्वरित. कोणताही एक गुण प्रबल जाला टार तो इतर डॉन गुणांचा अभिभव करतो. म्हणजेच त्यांचा पराभव करतो. त्यांना दाबून ठेवतो. २. अन्योन्यआश्रय – तीनही गुण एकमेकांना सहायक होउन एकमेकांच्या आश्रयाने आपली कार्ये करतात. ३. अन्योन्यजनन – सांख्य दर्शनानुसार जनन म्हणजे उत्पत्ति किंवा परिणाम. प्रत्येक गुण एकमेकांना उत्पन्न करतो म्हणजेच एकमेकांच्या स्वरूपांवर परिणाम करतो. ४. अन्योन्यमिथुन – मिथुनत्व म्हणजे एकमेकांचा सहवास. हे तीनही गुण एकमेकांना सोडून रहात नाहीत.

सत्त्वं लघु प्रकशकम् इष्टं उपष्टंभकं चलंच रजः।

गुरू वरणकामेव तमः प्रदीपवच्चार्थतो वृत्तिः।।

अर्थ – सत्त्व गुण लघु, हलका आणि प्रकाश देणारा असतो. रजोगुण प्रेरणा देणारा आणि गतिशील (क्रियाशील) असतो (चल असतो). टार तमोगुण हा गुरू म्हणजेच जड असतो. नियामक असतो (नियंत्रक असतो).हे तीनही गुण (पुरुषाच्या) प्रयोजनानुसार कार्य (व्यवहार) करतात. सत्त्वगुण हलका असल्याकारणाने वर जाणारा म्हणजे उर्ध्वगमन करणारा असतो. लघु असल्यामुळे तो विषयाला प्रकाशित करतो. विषयांचे जे ज्ञान इन्द्रियांद्वारे प्राप्त होतं ते सत्त्व गुणानेच प्राप्त होतं. म्हणून सत्त्व गुम्नाला प्रकाशक म्हणतात. रजोगुण प्रेरक असतो. प्रवर्तक असतो. तो कार्य करण्यास (इतर गुणानां) उद्युक्त करतो. वास्तु आणि विशायांतिल क्रियाशीलता ही रजोगुणाच्या प्रभावानेच असते. तमेगुन हा जड असल्यामुळे अवरोध करणारा किंवा प्रतिबंधक (नियंत्रक) असतो. आपल्या प्रतिबंधक शक्तीच्या सहयाने आणि गुरू असल्यामुळे तमोगुण इतर दोन्ही गुनान्वर आपले आवरण घालतो. याच कारणाने कही काळ पर्यन्त निष्क्रियता (अवरोध) निर्माण होते. मोह होतो. हे तीन गुण परस्पर विरोधी असेल तरीही त्यांच्यामध्ये एक विलक्षण सामंजस्य आहे. पुरुषाच्या प्रयोजनासाठी ( अर्थत: ) एकमेकांच्या सहाय्याने आपली कार्ये करतात.