सहाय्य चर्चा:वर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

नवीन उपवर्ग तयार करणे[संपादन]

प्रत्येक जिल्ह्यामध्ये 'समुद्रकिनार्‍यावरील गावे', 'नदीकाठावरील गावे' व '....तालुक्यातील गावे' असे उपवर्ग तयार करावयाचे आहेत. कसे करावेत याचे मार्गदर्शन हवे आहे. तसेच रत्नागिरी जिल्हाअसे दोन वर्ग आहेत.यात दुरुस्ती हवी आहे का?
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २०:४१, १४ जानेवारी २०१६ (IST)

वर्गीकरणांमध्ये मी खूपसे लक्ष घालत नाही, '....तालुक्यातील गावे' अशा स्वरुपाचे वर्गीकरण मराठी विकिपीडियावर आधीपासून वापरात आहे असे दिसते. ज्या तालुक्यांसाठी नाही त्या साठी आपण ते करु शकाल.
'..... नदीकाठावरील गावे' हे वर्गीकरण असावे असे मलाही वाटते. तसे ते आपणही करू शकाल. सवड उपलब्ध असल्यास, लेखाच्या खाली लावावयाचे साचे असतात (उदा. साचा:महाराष्ट्रातील जिल्हे तसा साचा विशीष्ट नदी किनाऱ्यां गावांबाबत बनवून आपण त्यात संबंधीत नदी किनाऱ्याच्या गावांच्या नावांची यादी देता येईल. अशाच स्वरुपाचे नदी खोरे विषयक साचे असू शकतील. (साचांचा फायदा असा की साचा लावला आणि साचात वर्गीकरण असेल तर लेखात साचाही लावला जातो आणि वर्गीकरणही आपसूक होते)
'..... समुद्रकिनार्‍यावरील गावे' अशा स्वरुपाचेही वर्गीकरण असावयास हरकत नाही, परंतु समुद्रकिनाऱ्यानुसार जिल्ह्यांच्या सिमा जेव्हा-केव्हा बदलल्या गेल्या ती माहिती विकिपीडियापर्यंत सहज पोहोचणे माहिती अद्ययावत ठेवणे असे होणे कठीण जाईल (हरकत आहे असे नव्हे) पण राज्यवार समुद्र किनाऱ्यावरील गावे, अमूक महामार्गावरील गावे अशी वर्गीकरणे असावयास हरकत नाही.
विकिपीडियात तांत्रिक दृष्ट्या उपवर्ग बनवले जात नाहीत, लेखात सरळ वर्ग जोडले जातात- हेच उपवर्ग किंवा वर्ग असू शकतात- लेखात जोडलेल्या उपवर्गाचे त्यापेक्षा वरीष्ठ स्तरीय वर्गात वर्गीकरण केले जाते. माझ्या या उत्तराने आपली शंका कितपत मिटली ते माहित नाही. कदाचित इतर मंडळी माझ्यापेक्षा अधिक चांगले उत्तर देऊ शकतील.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १५:५६, १५ जानेवारी २०१६ (IST)