सहजयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सहजयोग ही ध्यानसाधना करण्याचे तंत्र असून ती एक धार्मिक आणि साधना चळवळ आहे. निर्मला श्रीवास्तव उपाख्य श्रीमाताजी निर्मला देवी ह्या या चळवळीच्या संस्थापक-प्रणेत्या आहेत. १९७० साली त्यांनी ही चळवळ उभी केली.[१] ती प्राचीन भारतातील योगसाधनेशी निगडीत आहे.

सहजयोग ही मानवी जाणीवेत क्रांतिकारक उत्क्रांती घडवून आणणारी साधना पद्धती आहे, असे श्रीमाताजी यांचे प्रतिपादन आहे. त्या म्हणतात, " प्रत्येक मानवात जागृत होऊ शकणाऱ्या या जाणिवजागृतीच्या मार्गाने मानवजातीचे जागतिक ऐक्य साधले जाऊ शकते. या जागृतीने आपल्या अंतर्यामात अमुलाग्र परिवर्तन होईल. या प्रक्रियेने व्यक्ती नैतिक, समग्र, एकात्म आणि संतुलित होईल. शीतल लहरीच्या रुपात कोणत्याही व्यक्तीला विश्वव्यापक दिव्य शक्तीचा खराखुरा अनुभव येत असल्याची भावना जाणवेल. "स्वतःला जाणा " ही सर्व पवित्र ग्रंथांची मुख्य विचारधारा आहे- तीच येथे सुस्पष्ट होते आणि कोणताही माणूस आत्मजाणिवेच्या परमावधीला उपलब्ध होतो." [१]

संदर्भ[संपादन]

Shri Mataji at Easter 1985

अधिकृत महाजालस्थळ[संपादन]

  1. ^ "Home". Sahaja Yoga (इंग्रजी भाषेत). 2020-10-16 रोजी पाहिले.