सवेरा हॉटेल (चेन्नई)
भारत देश्याचे चेन्नई शहरात मिलपोरे येथे सवेरा हॉटेल हे फोर स्टार अकरा मजली हॉटेल आहे. याची आणखी दोन यूनिट आहेत त्यातील एक वालनट हॉटेल हे हैदराबाद येथे आणि दुसरे लोटस पार्क हे बंगलोर येथे आहे.
इतिहास
[संपादन]सवेरा हॉटेल सह भागीदारीत 1965 साली सुरू झाले. याचे संस्थापक ए. वेंकटकृष्ण रेड्डी, एम. रामराघवा रेड्डी आणि ए. श्यामसुंदरा रेड्डी, हे तिघेही मालमत्तेचे तसेच हॉटेल व्यवसायाचे अतिशय अनुभवी व जाणंकार होते. त्यांनी चेंन्नईतील मिलपोरे या शहरातील प्रमुख भर वस्तीत 20 खोल्या आणि उपहार ग्रह असे हॉटेल बांधण्यासाठी साधारण 5000 sq.mi. जमीन खरेदी केली. सन 1969 मध्ये या हॉटेल संस्थापकांनी त्यांच्या वाढत्या व्यवसायाची गरज लक्षात घेऊन “सवेरा हॉटेल प्रायवेट लिमिटेड” या नावाने कंपनी स्थापन केली. सन 1971 मध्ये या संबंधित भागीदारांनी त्यांची 1757 sq.mi. जमीन या सवेरा हॉटेल प्रायवेट लिमिटेड कंपनीला विकली त्याच बरोबर मूळं हॉटेल जवळची 4684 sq.mi. जमीन खरेदी केली. सन1972 मध्ये कंपनिने जेव्हा कामकाज चालू केले तेव्हा नवीन 125 खोल्यांची त्यात भर पडली होती. मुळचे 20 खोल्यांचे रूपांतर हॉटेलचे कार्यालय आणि सभाग्रहात केले. पोहण्याचे तलावाचे बांधकाम अगोदरच केलेले होते. हॉटेल व्यवसायाच्या दृष्टीने सर्व त्या बाबी सामान्य होत्या. सन 1975 मध्ये मीनार उपहार ग्रह चालू केले की जे मोघलाई पद्दतीचे अन्न पुरविण्याची सुविधा देते. तेथील विशेषतः म्हणजे ताज्या तंदूर डीशेष ! येथे 120 अतिथि एकावेळी बसू शकतात. येथे रात्री गायनाचे कार्यक्रम केले जातात.[१]
हॉटेल
[संपादन]हे 4 स्टार हॉटेल अतिशय सुंदर,व्यवसाइकासाठी आदर्श तसेच प्रवाश्यांसाठी आरामदाई आहे. या हॉटेलची विशेषतः म्हणजे येथे आधुनिक पद्धतीची 7 प्रकारची भोजन व्यवस्था आणि मदीरा व्यवस्था आहे. येथे विविध प्रकारचे जेवण बनविण्याचे उपहार ग्रह आहे त्यात पियानो, मालगुडी (साऊथ इंडियन उपहार ग्रह) करी टाउन, बे-146, बांबू बार, ब्रेव-रूम आणि बेकर्स बास्केट नावाचे केक शॉप यांचा समावेश आहे. या हॉटेलची 10 सभाग्रह आहेत.[२]
पियानो – हे उपहार ग्रह विविध पदार्थांचे माहेरघर आहे. विविध देश्यांचे अल्पोपअहार, लंच, डिंनर, येथे मिळतात. बे-146 - हे शीतल आहे. येथे रात्री हिप लायटिंग, डिजे, मिक्स ऑफ मेट्रो,हिप होप,क्लब आणि हाऊस म्यूजिक व्यवस्था आहे. येथील नाइट क्लब मध्ये मेरी मोमेंट्स रविवार ते शुक्रवार पर्यंत संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत चालू असतो. फोंडू - हे विविध विशेष रुचकर प्रकारचे मिटक्या मारत खाण्याचे उपहार ग्रह आहे.
बांबू बार - येथे विविध कॉकटेल शीतल पेये आणि कॉकटेल मदिरा पेये मिळतात.
बेकर्स बास्केट - या केक शॉप मध्ये कांही स्वादिष्ट पेस्ट्रीस आहेत की जे तुमच्या जेवणानंतर ते तुमच्या तोंडाची चव वाढवतील.
घटना
[संपादन]31 डिसेंबर 2007 रोजी नवीन वर्षाचे स्वागताप्रीत्यर्थ नांच गाण्यासाठी स्विमिंग तलावावर मंडप उभारला होता तो कोसळला आणि त्यात 3 व्यक्ति ठार झाल्या आणि 2 जखमी झाल्या.[३]
ठिकाण
[संपादन]या हॉटेलचे ठिकाण शोधण्यास अतिशय सोपे म्हणजेच चेंन्नईत 146, डॉ.राधाकृष्णन सलाई, मिलपोरे, चेन्नई, तामिळनाडू पिन कोड 600004 येथे आहे. अतिथिना u.s.कांसोलेट (अंदाजित 3किमी),थाऊजंड लाइट्स आणि टी नगर (अंदाजित 7किमी), मरीना बीच,st. George किल्ला, चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अंदाजित19 किमी), चेन्नई रेल्वे स्थानक (अंदाजित 8 किमी) अंतरावर आहेत. हे हॉटेल सामाजिक जबाबदारी जाणते आणि त्यासाठी सवेरा हॉटेल अकॅडमी स्थापन केलेली आहे व त्यामार्फत आदरपूर्वक विध्यार्थ्यांन्चे स्वागत करून त्यांचे कारकीर्द उज्ज्वल करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
हॉटेलची वैशिष्टे
[संपादन]या 4 स्टार हॉटेल मध्ये 3 उपहार ग्रह आहेत. उच्चतम प्रतीची स्वयपांक व्यवस्था, केक व केक शॉप, बार सेवा आहेत. तेथे एकटा सुद्दा आरामात आनंद घेऊ शकतो. या हॉटेलमध्ये ज्यांना बाहेर कामासाठी जावे लागणार नाही त्यांचेसाठी पोहण्याचा तलाव,स्वास्थ्य केंद्र, चित्रकार कलाग्रह, मालीश,सेवा उपलब्ध आहेत. येथे सुंदर देखावा केलेले मेजवानीसाठी प्रशस्त हॉल (Banquet) आहेत की जेथे अंदाजित 300 व्यक्ति सामाऊ शकतात. येथे तुम्ही लग्नाची मेजवानी (रिसेप्शन) आणि वाढदिवस साजरे करू शकता.यथायोग्य पद्दतीने व्यवसायिक अतिथींच्या गरजेनुसार सजविलेले सभाग्रह आहे. येथे अतिथींच्या सोईनुसार ब्वुटी सलून, मागणीनुसार डॉक्टर, कमानी करून सजविलेली सभाग्रह आणि फुलांची दुकाने आहेत.
खोल्या
[संपादन]येथे विविध प्रकारच्या खोल्या, त्यात एक्झिक्युटिव्ह, डिलक्स,स्टँडर्ड,व्यावसायिक खोल्यांचा समावेश आहे. वातानुकूलित सेवा, मोफत Wi-Fi, मिनी बार, दूरध्वनी, दूरचित्रवाणी, मेनू कार्ड, चहा / कॉफी मेकर, रायटींग टेबल,या सुविधा खोलीत उपलब्ध आहेत. हॉटेल एक्झिक्युटिव्ह, व्यवसाय क्लब,आणि स्टँडर्ड खोलीत विनंती नुसार DVD प्लेअर दिला जातो.
सेफ, इस्त्री, वर्तमानपत्र, वाहन तळ, 24 तास स्वागत कक्ष, 24 तास चेक-इन चेक-आऊट, धोबी, चलन बदली, ATM, GYM,व्यायाम शाळा, मश्याज केंद्र, शॉपिंग मॉल, इ. सेवा आहेत.