सलील वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सलील वाघ (१९६७:राजकोट, गुजरात, भारत - ) हे आघाडीचे व महत्त्वाचे मराठी कवी आहेत. त्यांचा मोठा प्रभाव जागतिकीकरणानंतरच्या मराठी कवितेवर आढळतो. त्यांचे, निवडक कविता, रेसकोर्स आणि इतर कविता, टाळलेल्या कविता इत्यादी सात कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. हिंदी कवी शमशेर बहादुर सिंह यांच्या कवितांवरचा त्यांचा दीर्घ लेखही प्रकाशित झाला आहे. रॅडिकल ह्युमनिस्ट असोसिएशनचे ते सक्रीय सदस्य होते. 'मराठी अभ्यास परिषद' ह्या संशोधन-संस्थेचे ते पाच वर्षे म्हणजे मार्च २०२४ पर्यंत अध्यक्ष होते.

काव्यसंग्रह[संपादन]

  • आधीच्या कविता
  • उलटसुलट
  • जुन्या कविता
  • टाळलेल्या कविता
  • निवडक कविता
  • रॆसकोर्स आणि इतर कविता
  • सध्याच्या कविता

पुरस्कार[संपादन]