सलीम चिश्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सलीम चिश्ती (१४७८-१५७२) हे मुघल साम्राज्यकालीन भारतातील चिश्ती परंपरेतील एक सुफी संत होते.

चरित्र[संपादन]

आपल्या गादीस पुरुष वारस मिळावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी मुघल सम्राट अकबर हा सिक्री येथे सलीम चिश्तींकडे आला होता. चिश्तींनी दिलेल्या आशीर्वादानंतर अकबरास दीर्घायू पुत्र झाला, असे मानले जाते. ह्या चिश्तींच्या गौरवार्थ अकबराने पुत्राचे नाव सलीम (नंतर सम्राट जहांगीर) असे ठेवले.